नांदेड दि.२६ संष्टेबर: युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक २५ संष्टेबर रोजी शासनाला निवेदन सादर करण्यात आले. राज्यातील अतिवृष्टी व दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. अशा परिस्थितीत शासनाने तात्काळ शुल्क माफी जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाने यापूर्वी दुष्काळग्रस्त काळात शुल्क माफीचा निर्णय घेतलेला असून, त्याच धर्तीवर सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता त्वरित शुल्क माफी द्यावी, असे निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाची दखल घेऊन शासनाने त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा युवक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याने स्पष्ट केले आहे की, जर शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर राज्यभरात विद्यार्थी आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा तुषार देशमुख यांनी दिला आहे













