देगलूर दि.४ जानेवारी: देगलूर येथील आंबेडकरी चळवळीचे युवा कार्यकर्ते विकास नरबागे यांची नुकतीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवक शहराध्यक्षपदी खा. प्रा. रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष हाणमंत पाटील व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. या निवडीबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ता म्हणून विकास दत्ताजी नरबागे यांची चांगलीच ओळख आहे. महाविद्यालयीन काळातच नेतृत्व करण्याची तीव्र इच्छाशक्ती असलेला विकास नरभागे हा देगलूर महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव राहिलेला आहे. आंबेडकरी चळवळीतील संघटना युवा पॅंथरचा तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षाचा तालुका कार्याध्यक्ष आणि भीमप्रहार सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून नरबागे महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक आदीं क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. रक्तदान शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ‘एक पेन, एक वही’ उपक्रम, दंत तपासणी शिबीर, बौद्ध स्मशानभूमीसाठी शवदाहिनीकरीता प्रयत्न, तसेच विविध सामाजिक उपक्रम नरबागे यांनी राबवित सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
विकास नरबागे यांच्या कार्याची दखल घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून देगलूर काँग्रेस युवक शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी खा. प्रा. रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष हाणमंत पाटील, रामदास पाटील सुमठाणकर, माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार, नगरसेवक मीरामोहीय्योदीन, नगरसेवक सय्यद मोहितोद्दीन रफाई, नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे, माझी उपनगराध्यक्ष बिस्मिल्ला खुरेशी, नगरसेवक प्रतिनिधी शेख महेमुद, माजी नगरसेवक निसार देशमुख, नगरसेवक लालू कोयलावार, नगरसेवक प्रतिनिधी सुनिल येशमवार, काँग्रेस शहर उपाध्यक्ष फायक अली आदीं मान्यवरांनी उपस्थितीत निवड करण्यात आली. यावेळी नरबागे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून युवक शहराध्यक्षपदी निवड केली आहे, या पदाचा मी प्रामाणिकपणे काम करीन, असे त्यांनी सांगितले.













