नांदेड दि.१४: वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीपुजनाच्या रात्री एक घरफोडून चोरट्यांनी 46 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 हजार रुपये किंमतीचे लोखंडी अँगल चोरणाऱ्या आरोपींच्या नावासह तक्रार देण्यात आली आहे.एक चोरटा पळून जातांना गेटवरुन खाली पडल्याने मार लागल्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत घडला आहे. एका ऍटोमध्ये प्रवास करणाऱ्या चोरट्यांनी प्रवाशाचे सहा हजार रुपये रोख रक्कम चोरली आहे.
अनिल ग्यानोबा भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहरातील देगावचाळ येथे त्यांचे घर आहे. ते आणि त्यांचे कुटूंबिय 13 नोव्हेंबरच्या रात्री जेवन करून झोपल्यानंतर कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि 46 हजार 200 रुपयांचा सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आडे अधिक तपास करीत आहेत.
अक्षय पद्माकर महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 11 नोव्हेंबरच्या सायंकाळी 5 ते 12 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे कुटूंबिय काबरानगर येथील त्यांचे घर बंद करून दिवाळीसाठी मुळ गावी गेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी दरवाज्यामध्ये असणारे इंजिस तोडून आत प्रवेश केला आणि 1 किलो 182 ग्रॅम वजनाचे दोन चांदीचे ताट किंमत 25 हजार 26 रुपये चोरून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार माळवे अधिक तपास करीत आहेत.
शेख रफीक शेख रज्जाक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेच्यासुमारास त्यांचे वडील, मामा आणि मामाचा मुलगा असे रहिमपुर येथील आपल्या मोकळ्या भुखंडावर गेले असतांना तेथे ठेवलेले 10 लोखंडी अँगल 5 हजार रुपये किंमतीचे शेख रहिम, रफिक इनामदार, शेख अयान, बासु आणि अलताफ शान आयुब खान यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार यालावार अधिक तपास करीत आहेत.
वैष्णवीनगर, बीडीडीएस कार्यालयाच्या शेजारी राहणारे अशोक शामराव केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिवाळी पुजनाच्या रात्री 13 नोव्हेंबर रोजी 3.3 वाजेच्यासुमारास त्यांच्या घराच्या गेटमध्ये प्रवेश करून कोणी तरी चोरटा चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना कुत्रा जोरात भुंकला तेंव्हा ते आणि त्यांच्या येथे राहणारे किरायेदार जागे झाले बाहेर येवून पाहिले असतांना चोरून पळून जात असतांना गेटवरुन खाली पडला, त्याच्या डोक्याच्या मागील बाजुस मार लागला. तो चोरी करतांना सापडला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भारती अधिक तपास करीत आहेत.
खडकमांजरी ता.लोहा येथील शेषराव काशीनाथ सोनवणे हे व्यक्ती दि.13 नोव्हेंबरच्या दुपारी 12.30 वाजता काब्दे हॉस्पीटल ते बसस्टॅंड असा ऍटोमधून प्रवास करीत असतांना त्यांच्या सोबत बसलेल्या अज्ञात चोरट्याने मागे पुढे सरकण्याचा बहाणा करून त्यांच्या खिशातील 6 हजार रुपये चोरले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शेख लियाकत अधिक तपास करीत आहेत. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!