नांदेड प्रतिनिधी | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (SRTMU)स्थापनेपासून पहिल्यांदाच किंवा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यापीठ मुख्य परिसरातील संकुलाच्या विद्यार्थ्यांना ‘युवक महोत्सव ज्ञानतीर्थ २०२५‘ मध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. सर्वसाधारण उपविजेतेपद लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय तर नृत्यऋषी दिवंगत ऋषिकेश देशमुख चषक विजेता संघ म्हणून लातूर येथील जय क्रांती कला महाविद्यालय यांना मिळाला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस ग्रामीण विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ २०२५ हा दिनांक १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला. आज १५ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, सोलापूर सकाळ पेपरचे संपादक सिद्धाराम पाटील, मुंबई येथील सनरायझिंग प्रोसेसिक इंडस्ट्रीजचे संचालक निळकंठ चौधरी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, नारायण चौधरी, हनुमंतराव कंधारकर, डॉ. मा.मा. जाधव, अधिसभा सदस्य डॉ. विजय भोपळे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पसचे संचालक डॉ. विजय पवार आणि सर्व विद्यार्थी विभाग विकास मंडळाचे सल्लागार यांची उपस्थिती होती.
या विजयामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या संघप्रमुखांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर ललित व प्रयोजित कला संकुलाचे प्रभारी संचालक डॉ.पृथ्वीराज तौर, प्रा. शिवराज शिंदे आणि परिसरातील विजेत्या सर्व विद्यार्थ्यांची विशेष अभिनंदन केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसच्या ग्रामीण विज्ञान महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ ते १५ ऑक्टोंबर, २०२५ या दरम्यान आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ – २०२५’ मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला. या महोत्सवात सर्वसाधारणपद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मुख्य परिसर यांनी तर सर्वसाधारण उपविजेतेपद दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर आणि नृत्यऋषी दिवंगत ऋषीकेश देशमुख चषकाचा विजेता जय क्रांती कला महाविद्यालय, लातूरचा संघ ठरला.
या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवातील पारितोषिके पुढीलप्रमाणे: चित्रकला: प्रथम – स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड, द्वितीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर, तृतीय- शिवाजी महाविद्यालय, कंधार. कोलाज: प्रथम – स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड, द्वितीय – शिवाजी महाविद्यालय, कंधार, तृतीय – राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. पोस्टर मेकिंग: प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड, द्वितीय – दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर. मृदमूर्तिकला: प्रथम- कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय, उमरी, द्वितीय – बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत, तृतीय – शिवाजी महाविद्यालय, परभणी. व्यंगचित्रकला : प्रथम- दयानंद कला महाविद्यालय, लातूर, द्वितीय – राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड, तृतीय – स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड. रांगोळी : प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, द्वितीय – महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा, तृतीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर मेहंदी : प्रथम- चन्ना बसवेश्वर फार्मसी कॉलेज, लातूर, द्वितीय – शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर, तृतीय – दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर स्थळ छायाचित्रण : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड, द्वितीय – महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा, तृतीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर. कलात्मक जुळवणी (इंस्टॉलेशन) : प्रथम- शिवाजी महाविद्यालय, कंधार, द्वितीय – दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय – श्री. शिवाजी महाविद्यालय, परभणी. वादविवाद : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड, द्वितीय – श्री. शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी. तृतीय: दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर. वक्तृत्व : प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, द्वितीय(विभागून) – शिवाजी महाविद्यालय, कंधार आणि श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी, तृतीय (विभागून): इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, नवीन नांदेड आणि दयानंद विधी महाविद्यालय, लातूर. कथाकथन : प्रथम- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर, द्वितीय (विभागून): दयानंद कला महाविद्यालय, लातूर आणि जयक्रांती अध्यापक महाविद्यालय, लातूर, तृतीय (विभागून)- महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा आणि श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी. शास्त्रीय गायन : प्रथम – सरस्वती संगीत महाविद्यालय, लातूर, द्वितीय- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर, तृतीय (विभागून) गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रीकी महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड आणि यशवंत महाविद्यालय, नांदेड. शास्त्रीय तालवाद्य : प्रथम- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी, द्वितीय – शरदचंद्र महाविद्यालय, नायगाव (बा.), तृतीय- महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा आणि सरस्वती संगीत महाविद्यालय, लातूर. शास्त्रीय सुरवाद्य (वैयक्तीक) : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड. द्वितीय – श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी, तृतीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर. सुगम गायन भारतीय : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड द्वितीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर, तृतीय – महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर. सुगमगायन पाश्चात्य : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड द्वितीय – धुंडा महाराज महाविद्यालय, देगलूर, तृतीय (विभागून): दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर आणि दयानंद विधी महाविद्यालय, लातूर समूहगायन भारतीय : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड, द्वितीय: दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय- यशवंत महाविद्यालय, नांदेड. समूहगायन पाश्चात्य : प्रथम- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर, द्वितीय – एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, नांदेड, तृतीय: स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड. कव्वाली (सांघिक) : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड, द्वितीय – राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर, तृतीय- महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर. पोवाडा (सांघिक) : प्रथम- महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, द्वितीय – स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड तृतीय (विभागून)- यशवंत महाविद्यालय, नांदेड आणि संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सीट), लातूर. लावणी (सांघिक) : प्रथम- शारदा कला व विज्ञान महाविद्यालय, परभणी, द्वितीय: दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय- (विभागून) स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड आणि जयक्रांती कला महाविद्यालय, लातूर. जलसा : प्रथम- श्री. शिवाजी महाविद्यालय, कंधार, द्वितीय – बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत तृतीय (विभागून)-स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड आणि शिवाजी महाविद्यालय, परभणी. लोकसंगीत (फोकऑर्केस्ट्रा) : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड, द्वितीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर, तृतीय- महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर. एकांकिका (सांघिक) : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड – प्रेम की यातना, द्वितीय – राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर- ड्रायव्हर, तृतीय (विभागून)- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर – अध्याय पाचवा आणि दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर- अॅडमिमशन. विडंबन अभिनय : प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, द्वितीय – एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, नांदेड, तृतीय- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड. मूक अभिनय : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड, द्वितीय – एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, नांदेड, तृतीय- चन्ना बसवेश्वर फार्मसी कॉलेज, लातूर नक्कल : प्रथम- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर, द्वितीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर, तृतीय(विभागून): दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर. शास्त्रीय नृत्य : प्रथम- यशवंत महाविद्यालय, नांदेड, द्वितीय: जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर, तृतीय: दयानंद कला महाविद्यालय, लातूर. लोकनृत्य : प्रथम- जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर, द्वितीय: संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सीट), लातूर, तृतीय : राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. आदिवासी नृत्य : प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, द्वितीय –बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट जि. नांदेड. तृतीय- रेणुकादेवी कला वरिष्ठ महाविद्यालय, माहूर. उत्कृष्ठ दिग्दर्शक (वैयक्तिक) : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड – अभिजित भड (प्रेम की यातना), द्वितीय – राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर – निकिता कोकाटे – ड्रायव्हर, तृतीय (विभागून) : दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर- नवलजी जाधव (अॅडमिमशन) आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर- (अध्याय पाचवा) उत्कृष्ट अभिनय (पुरुष) : प्रथम- स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड – अभिषेक शिंदे ( एकांकिचे नांव-प्रेम की यातना, पात्र – मुलगा), द्वितीय – राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.- प्रतिक वाघमारे ( एकांकिचे नांव- ड्रायव्हर, पात्र – यशवंत), तृतीय- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर- गजानन मिश्रा (एकांकीचे नाव-अॅडमिमशन, पात्र-बाप) उत्कृष्ट अभिनय (स्त्री) : प्रथम- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर- निकिता कोकाटे ( एकांकिचे नांव- ड्रायव्हर, पात्र – माउली),, द्वितीय – दयानंद विधी महाविद्यालय, लातूर – समृद्धी बिराजदार (एकांकिचे नांव- लाली, पात्र – आउली), तृतीय (विभागून)- श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, विष्णुपुरी – श्रावणी खंदारे (एकांकिचे नांव- विषाद, पात्र – सुमी) आणि स्वारातीम विद्यापीठ, परिसर, नांदेड – अदिती केंद्रे ( एकांकिचे नांव-प्रेम की यातना, पात्र – मुलगी)