मुंबई | एसटी बँकेसंदर्भात #STBank सहकार आयुक्तांकडे एका सभासदानं गंभीर तक्रार केलीये. सदावर्ते पुरस्कृत संचालक मंडळानं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे बँक डबघाईला येत असल्याने संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी या सभासदानं केली आहे. नवं संचालक मंडळ एसटी बँकेत आल्यावर अंदाजे 110 कोटींच्या ठेवी काढण्यात आल्याचा उल्लेख सभासदानं आपल्या पत्रात केला आहे.
नव संचालक मंडळ स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेवर आल्यानंतर अंदाजित 110 कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्याचा दावा एका सभासदाने केला आहे. बँकेचा पतगुणोत्तर #क्रेडिट_डिपॉझिट_रेशो 85 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.य आरबीआयच्या नियमांनुसार हा रेशो 72 टक्क्यांपर्यंत असायला हवा मात्र तो अधिक असल्यानं बँकेत आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप.बँकेत जवळपास 2 हजार 300 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. नव संचालक मंडळ आल्यानंतर एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर कंत्राटी नव्या एमडी पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. या पदासाठी अनुभव गरजेचा असताना एका 22 वर्षीय अननुभवी तरुणाला संधी दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
70 वर्षे कार्यरत असणारी बँक डबघाईला
जवळपास काही वर्षांपासून कामगार संघटनेचं स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेवर वर्चस्व होतं. सदावर्ते पॅनलने सत्ता मिळवल्यानंतर बैठकींमध्ये मांडलेल्या ठरावांवरून वाद निर्माण होत होते. संचालकांच्या मनमानीला कंटाळून महाव्यवस्थापकांनी देखील राजीनामा दिला. एसटी बँकेत जुलै महिन्यात नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. परंतु या संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने आणि चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे 70 वर्षे कार्यरत असणारी बँक डबघाईला येत आहे.