नांदेड :- भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ या योजनेअंतर्गत अग्नीवीरवायु म्हणून भारतीय सेवेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. अग्नीविरवायू पदाच्या परीक्षेसाठी http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी 27 जुलै ते 17 ऑगस्ट 2023 या कालावधीत या पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड