👉उद्याच्या हिमायतनगर शहर बंद ला काँग्रेस चा पाठिंबा…
हिमायतनगर प्रतिनिधी/-राज्यातील अंतरवाली सराठी जिल्हा जालना या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणसाठी भव्य उपोषण चालू असताना येथील उपोषण कर्त्यावर लाठीचार्ज करीत महिला, पुरुष यांना गंभीर पोलिसांनी जखमी केले असून या ठिकाणी सरकारने सखोल चौकशी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी संदर्भात घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत उद्या दि 4 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने हिमायतनगर शहर बंद ची हाक देण्यात आली त्याला काँग्रेस पक्षाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे
महाराष्ट्र राज्यात बरेच वेळेस मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आले परंतु राज्य सरकारने अद्यापही केंद्र सरकार यांच्या कडे प्रस्ताव न पाठवता मराठा समाजाची अवेहलना केली असून या ठिकाणी लोकशाही मार्गाने अतरवाली जिल्हा जालना या ठिकाणी उपोषण चालू असताना येथील पोलिसानी तेथील मराठा समाजावर बेसुमार लाठचार्ज करत महिला,पुरुष यांना गंभीर जखमी केली असून त्या घटनेचा निषेध उद्या दि.4 सप्टेंबर रोजी हिमायतनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे त्याला काँग्रेस पक्षाकडून जाहीर पाठिंबा देत हिमायतनगर येथील तहसीलदार यांना एक निवेदन दिले आहे व मराठा समाजाच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात व ह्या लाठीचार्जची तात्काळ सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असे सांगण्यात आले
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी,काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सुभाष मामा शिंदे,शिवाजी माने पाटील, श्रीदत्ता पाटील,पंडित ढोणे,वैभव शिंदे सह आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते













