
लातूर प्रतिनिधी | विजय पाटील |
दि : १६/१०/२०२३
लातूर :– नुकतेच लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय शाहू महाराज चौक लातूर येथील ,7 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.1)गंगणे अथर्व- 8वी अ.(2) उजेडे फरीद-11वी MCVC.(3)गंगणे अर्णव-9 वी ग.(4)कोथिंबीरे स्वस्तिक-9 वी ग.(5)गिरी अभिषेक-9 वी ग.(6)हुंबे राम-8 वी अ.(7)हुंबे लक्ष्मण-8 वी फ.या विद्यार्थ्यांनी कॅरम स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्या बद्दल विद्यार्थ्यांचा ज्ञानेश्वर शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदरील 7 ही खेळाडूंची निवड धाराशिव येथे होणाऱ्या विभागीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.वाघमारे सर व उपमुख्याध्यापिका श्रीमती. नरहारे मॅडम पर्यवेक्षक श्री. मलवाडे सर पर्यवेक्षक श्री.क्षिरसागर सर क्रीडा विभाग प्रमुख श्री.रुकमे सर ,क्रीडा शिक्षक समाधान बुर्गे सर आदि गुरुजनांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्यप्रभा न्यूज