
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-भारतीय जनता पार्टीच्या हिमायतनगर येथील कार्यकारणीचा नुकताच विस्तार झाल्याने त्या विस्तारामध्ये जिल्हा सरचिटणीस म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन भाऊ तुप्तेवार यांची निवड करण्यात आली तर तालुका अध्यक्ष म्हणून गजानन चायल यांची निवड भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर यांनी केली त्यामुळे या भाजपाच्या नवनिर्वाचित टीमने पक्ष वाढीचे काम तालुक्यात खूप मोठ्या जोरात चालू केले असल्याचे दिसून येत आहे त्यांनी नुकतेच बोरगडी, वारंगटाकळी , पार्डी येथील असंख्य ज्येष्ठ नागरिक व तरुणांचा भाजपा मध्ये प्रवेश करून घेतला व आता काल दिनांक पाच ऑक्टोबर रोजी धानोरा येथील माजी सरपंचाच्या पतीचा व तत्कालीन 3 ग्रामपंचायत सदस्यचा भाजपा पार्टी मध्ये प्रवेश करून घेत तालुक्यात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे काम त्यानि केले.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या हिमायतनगर येथील नवनिर्वाचित टीमने शहराप्रमाणे ग्रामीण भागातही पक्ष वाढीचे काम जोरात सुरू केले आहे ग्रामीण भागातील सक्रिय पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात पदांचे वाटप करुन तालुक्याची संघटना मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला आहे तालुक्यातील बोरगडी, वारंगटाकळी,पार्डी सह दि 5 ऑक्टोबर रोजी धानोरा येथील माजी सरपंचाच्या पतीचा व तत्कालीन 3 ग्रामपंचायत सदस्या सह असंख्य नव तरुण युवकांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करून घेत येथील दिग्गज नेत्यांना त्यांनी झटका दिला आहे त्यामुळे तालुक्यात भाजपा ची वाढती ताकत पाहून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना ह्याचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित चांगलाच फटका बसणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी धानोरा ज येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील गणेश दिलीप सोळंके यांची अग्णीवीर ह्या सैन दलात निवड झाल्या बद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून त्यांचा गौरव केला
यावेळी माजी सरपंच प्रतिनिधी रमेश तुळसे,लक्ष्मण बरसेटवार, शुभम बरसेटवार, दिनेश आमेवार, गणेश इटेवाड ज्ञानेश्वर सोळंके नाथा माचेवाड, नारायण गुरलेवार, रामा पंदलवाड ,गजू तवर राजू आचेमवाड, राजू पतलेवार ,ज्ञानेश्वर येरेकर, केशवराव येरेकर,कपिल नारायण वळसे ,मुन्ना बरशेटवार,भैय्या आचमवार ,सचिन पतलेवार,सह आदी नव तरुण युवकांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला..