नांदेड : नांदेड येथील राम घाटावर सुखकर्ता, दुखहर्ता गणरायाच्या विसर्जनावेळी पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली महानगरपालिकेकडून अपमान केले जात आहे. त्यामुळे असंख्य गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन ते विसर्जन या दरम्यान मोठ्या भक्तीभावाने पुजा अर्चना केली जाते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ घोषणा देत गणरायाचे विसर्जन केले जाते. हे विसर्जन नदी, विहार, तलाव आणि समुद्रात करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार पाण्यातच गणरायाचे विसर्जन केले जाते. पण नांदेड महानगरपालिकेकडून अक्षरक्षः अपमान केले जात असल्याचे गणेश भक्तांकडून सांगितले जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, आज ( दि 28 सप्टेंबर गुरुवार ) नांदेड येथील जुना मोंढा राम घाट येथे गणपती विसर्जनासाठी आलेल्या भावीक भक्तांकडून गणरायाची मुर्ती पाण्यात बुडवून परत वर काढली जात आहे. पर्यावरण संरक्षणच्या नावाखाली गणरायाचे अपमान का? असा प्रश्न विचारणाऱ्या गणेश भक्तांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून धमकी मिळत असल्याचे सांगण्यात येते. पर्यावरण संरक्षण महत्त्वाचे आहे, त्यासाठी पाण्यात गणपती विसर्जन करुन दिले नाही तरी चालेल, पण कचऱ्याच्या गाडीत गणरायाला का ठेवले जात आहे? असे कृत्य करणे गणरायाचे अपमान नाही का? अशा प्रकारचा महानगरपालिकेकडून गणरायाच्या विसर्जनासंदर्भात तसा कोणता आदेश आला आहे का? या प्रश्नावर अधिकारी काही बोलायला तयार नाहीत असे गणेश भक्तांकडून सांगितले जात आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड