मुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आता गुन्हा दाखल करुन घेतला आहे.किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी खाजगी वृत्त वाहिनी आणि अनिल थत्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. भादंवि ५०० (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ई) आणि ६७ (अ) अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. याप्रकरणी मंगळवारी किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी याबाबत कारवाईची मागणी केली होती. पावसाळी अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात व्हायरल व्हिडीओप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि सखोल चौकशी करावी, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!