धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांकडून संताप व्यक्त?
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पीक कर्ज योजनांचा लाभ मिळालाच नाही – माधव पाटील
धर्माबाद प्रतिनिधी: महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली होती योजनेचा अंमलबजावणी करिता ठेवण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही विशेष म्हणजे सुरुवातीलाही प्रकरणे आधार प्रमाणीकरणामुळे अडकली असल्याचे बँकेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते यापैकी अनेकांनी आधार प्रमानीकरण करूनही योजनेचा लाभ मिळत नसल्याने नेमकी आडकाडी का व कशासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे नवीन सरकार आले.मुखमंञी साहेबांनी या विषया कडे लक्ष घालुन मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा अशी धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांकडून होतं आहे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा धर्माबाद व शाखा येताळा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा धर्माबाद व शाखा करखेली, महाराष्ट्र बँक धर्माबाद, शाखा धर्माबाद, शाखा करखेली, महाराष्ट्र बँक धर्माबाद व शाखा धर्माबाद बँक ऑफ बडोदा, करखेली शाखा ,इत्यादी बँकेच्या माध्यमातून 52 गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची जबाबदारी देण्यात आली तालुक्यात उपरोक्त बँकेच्या वतीने प्रत्येक शाखेतील काही खातेदारांचे त्यांच्या कर्जमाफी योजनेत समावेश झाल्याचा मेसेज आला पण प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाली नाही किंवा नव्याने पीक कर्ज मिळाले नाही योजना सुरू होऊन देखील चार वर्ष संपले तरी कर्जमाफीचा लाभ मिळत नसेल तर नेमक्या अडचणी काय ? हे तरी कळवा व मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे आता राज्यातील सरकारमध्ये बदल झाला असून पूर्वीच्या सरकारने जाहीर केलेल्या या कर्जमाफी योजनेचा लाभ चार वर्षापासून अनेक लाभार्थ्यांना मिळालाच नाही . मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळेल का ? सदरील शेतकरी उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी वंचित राहिले तर दोष कुणाचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आज घडीला राहिलेला आहे तालुक्यातील कुटुंब प्रमुख असलेल्या शेतकऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसा कडून मृत्यू प्रमाणपत्र व आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली मात्र अशा या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच नव्याने पीक कर्ज मिळाले नाही तसेच नव्याने पीक कर्ज मिळाले नाही यात नेमकी अडचण काय याची सहानिशा करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देत नवीन पीक कर्ज वाटपाचे काम त्वरित करावे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांचे वारसदार यानी तहसील कार्यालय व एसडीओ कार्यालय व पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले व 14 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय येथे वारसदार माधव ईरना पाटील व नागनाथ पाटील व करण स्वामी व शिवशंकर शिवशटटे व साईनाथ रामचंद्र वाचेबाड सर्व वारसाकडून उपोषणाचा इशारा दिला .
सदरील कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नाव आले त्यांच्या कर्जाची रक्कम शासनाने बँकेकडे भरणा केली व ते शेतकरी कर्जमुक्त झाले त्यामुळे तशा शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज देण्यात आले.तथा मयत शेतकऱ्यांचा वारसांच्या शासनाने खात्यामध्ये मात्र अद्यापही रक्कम जमा न झाल्याने मयत शेतकऱ्यांचे वारसदार आर्थिक दृष्ट्या हैराण झाले आहेत महाविकास आघाडीच्या सरकारने घोषणा करून देखील चार वर्षे उलटले तरी नवीन सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करून मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा.
सदरील कर्जमाफी योजनेअंतर्गत
ज्या शेतकऱ्यांचे नावे असलेली रक्कम शासनाच्या वतीने बँकेकडे भरणा करण्यात आली नाही त्यांना पीक कर्ज देण्यासाठीचे अधिकार स्थानिक शाखेत नसल्याचे एसबीआय चे कर्मचारी यांनी शासनाच्या वतीने मयत खातेदाराच्या वारसाच्या खात्यामध्ये रक्कम जर शासनाने भरणा केली तरच आम्हाला नवीन पीक कर्ज आम्ही देऊ शकतो असे एसबीआय बँकेचे कर्मचारी यांनी सांगितले .व बँकेने मयत शेतकऱ्यांचे खाते होल्ड केले व त्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व खात्यामध्ये पैसे जमा आहेत तरीपण त्यांना वारसदारांना खात्यामध्ये पैसे उचलता येत नाहीत बँकेने खाते होल्ड केले आहे
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मध्ये मयत शेतकऱ्यांच्या वारसांना खात्यामध्ये शासनाच्या वतीने पैसे भरून मयत शेतकऱ्यांच्या वारसांना नवीन सरकार न्याय मिळवून देईल का ? मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा मयत शेतकऱ्यांचे वारसदार माधव ईरना पाटील यांनी पञकाराशी बोलताना सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मध्ये मयत शेतकऱ्याच कर्ज माफ होऊन देखील? वारसांना फवारणीसाठी औषध घेण्यासाठी व जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नवीन पीक कर्ज मिळणार का?
अतिवृष्टीने शेतातील पिके पाण्यात भिजून जात आहेत शेतकऱ्यांच्या हाती काही लागले का ? पाऊस झाल्याने पिके पाण्याखाली गेली शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले पिकांना फवारणीसाठी व जीवनावश्यक वस्तूसाठी मयत शेतकऱ्यांच्या वारसदार चिंताग्रस्त झालेले आहेत.
जुलै महिना चालू आहे पेरणी करून सुध्दा काही पिके पाण्याखाली गेली व काही पिकांना फवारणी साठी औषध व जीवनावश्यक वस्तू कशा घ्याव्यात शेतकरी वारसदार चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे महाविकास आघाडीच्या शासनाने घोषित केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मध्ये मयत शेतकऱ्यांचे माफी मध्ये नाव येऊन देखील ? त्यांच्या वारसांना नवीन पीक कर्ज वेळेवर मिळाले असते तर पेरणीसाठी सावकारकडुन कर्ज काढावे लागत नव्हते मयत शेतकऱ्यांचा वारसांना नवीन युती सरकारकडून मयत शेतकऱ्यांच्या वारसांना फायदा होईल का ? मात्र नवीन पीक कर्ज त्यांच्या वारसांना न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या वारसांना पेरणीला सुद्धा उपयोग झाला नाही फवारणीस साठी औषध व जीवनावश्यक वस्तू साठी व सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी गतिमान शासन न्याय मिळवून द्यावा शासन या गंभीर बाबीचा विचार करून शेतकऱ्यांच्या वारसांना नवीन पीक कर्ज तात्काळ द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वारसा कडून होत आहे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा.
तालुक्यातील कुटुंब प्रमुख असलेल्या शेतकऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसा कडून मृत्यू प्रमाणपत्र व आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना अद्यापही पीक कर्ज योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच नव्याने पीक कर्ज मिळाले नाही
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळेल का? असा प्रश्न मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाकडून मयत शेतकऱ्यांच्या वारसदार यांना होत आहे मयत शेतकऱ्यांचे वारसदार करण पंचाक्षरी स्वामी शासन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्याच्या वारसाकडून तहसिल कार्यालय यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड # धर्माबाद