नांदेड. दि२८: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची 1 ऑक्टोबर रोजी मार्केट कमीटी मैदान, नवा मोंढा नांदेड येथे सायं 6.00 वा. जाहीर सभा होणार मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देवून सरसकट ओ.बी.सी. प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते. सरकारने एक महिण्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढूत असे अश्वासन दिल्या नंतर जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण तूर्तास स्थगीत करुन त्याची साखळी उपोषणात रुपांतरीत केले. सरकारने दिलेला अवधी संपण्यास काही मोजकेच दिवस आता शिल्लक आहेत. पण आजुनही काही हालचाली होताना दिसून येत नाहीत म्हणुन जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौरा काढून मराठा समाजात जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे. त्याच अनुषंगाने ते नांदेड मध्ये सुध्दा येत असून त्यांच्या सभेची जय्यत तयारी सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे. मराठा समाजाला. आरक्षण मिळावे म्हणुन महाराष्ट्रातील मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून झगडत असून सरकारने काही तज्ञ जाणकारांनी सांगुन देखील वेळावेळी फसवे आरक्षण देवून समाजाची दिशाभूल केली. यावेळी मात्र जरांगे पाटील यांनी जे उपोषण आंतरवाली सराटी येथे चालू केले होते. ते कायदयाला धरून आधी मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिध्द करा या पध्दतीचे आहे. त्यामुळे समाजातील युवकांना कुठेतरी आता आपल्याला आरक्षण मिळेल अशी आशा वाटत आहे. परंतु सरकारने जरांगे पाटलांनी दिलेला 40 दिवसाचा अवधी हा काही दिवसात संपणार आहे.

मराठा आरक्षणाचा अत्यंत जिव्हाळयाचा प्रश्न असताना सरकार मात्र या प्रश्नावर योग्य तोडगा काढील की नाही याची शाश्वती मराठा समाजाला दिसत नाही, अशी चर्चा समाज बांधवांमध्ये होत आहे. मराठा समाज बांधवांनी अतिशय शांततेत व संयमाने आपली भूमीका शासन दरबारी मांडलेली आहे. या अगोदरच्या सरकारने सुध्दा वेळोवेळी फसवे आरक्षण देवून समाजाची प्रचंड निराशाच केली आहे. आताही तसेच होऊ नये म्हणुन समाजातील अभ्यासू समाजबांधव सरकारच्या प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष देत आहेत. मराठा आरक्षण या विषयाचे प्रबोधन व्हावे पुढील आंदोलनाची दिशा समाज बांधवांना सांगण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील देवराये कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देण्यासाठी तसेच त्यांच्या सोबत जिल्हयात विविन्द ठिकाणी चालू असणारे साखळी उपोषण आंदोलन करणाऱ्या समाज बांधवांच्या भेटी घेण्यासाठी। त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवामोंढा नांदेड येथे दि. 1 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता जाहीर सभा होणार आहे. तरी सदरील सनेस जिल्हयातील सर्व उपोषणकर्ते आंदोलन कर्ते, समाजबांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे. #सत्यप्रभा न्यूज