
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी | विजय पाटील |
वैजापूर : दि १२/०९/२०२३
वैजापूर शहरातील लक्ष्मी लॉजवर छापा टाकून पोलिसांनी कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या लॉजवर लॉज चालक मालक व मॅनेजर मिळून आले. पोलिसांनी रुम नंबर २०१ मधील पीडित महिलेची सुटका केली. दि. 11/09/23 रोजी दुपारी 15.40 वाजता महाराणा प्रताप चौक वैजापूर येथील लक्ष्मी लॉजच्या पहिल्या मजल्यावर रूम क्रमांक 201 मध्ये छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.
याठिकाणी लॉज मालक व मॅनेजर हे स्वत:चे आर्थिक फायद्या करिता महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक व सपोनि आरती जाधव अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक यांच्या पथकांने दिनांक 11/9/2023 रोजी दुपारी ३ ते ३.४० वाजेच्या सुमारास लक्ष्मी लॉज परिसरात सापळा लावला.
एका डमी ग्राहकांस लक्ष्मी लॉज येथे पाठवले. तेथे लॉज मॅनेजर मच्छिंद्र विनायक जगदाळे यांना ग्राहक भेटला. लॉज मालकाने त्या डमी ग्राहकाला पहिल्या मजल्यावरिल रूम नं 201 मध्ये जाण्यास सांगितले. तेथे मॅनेजर एक महिलेला घेवून आला. याच दरम्यान डमी ग्राहकांने पोलिसांना इशारा करून बोलावून घेतले. पोलिस पथकाने छापा मारून पीडित महिलेची सुटका केली.
छत्रपती संभाजीनगर