हिमायतनगर प्रतिनिधी /- तालुक्यात गणेशोत्सवा सह अन्य सणांच्या काळात हिमायतनगर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अप्पर पोलीस अधीक्षक धरणे साहेब व हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी शहरातील गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या हद्दपारीचा प्रस्ताव हदगाव येथील उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार मॅडम यांच्या कडे पाठवला होता त्या आदेशाला परित करून हिमायतनगर पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर आरोप असलेल्या १४ गुन्हेगारावर गणेश उत्सव काळात हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे व आगामी काळातील गणेश ,दुर्गा उत्सवात कुणीही कायदा व सुव्यवस्था बिगडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर सुद्धा असेच गंभीर दखल पात्र गुन्हे दाखल करून हद्दपार करण्यात येईल त्यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आप आपले सण व उत्सव शांततेत साजरे करावे असे आव्हान हिमायतनगर पोलिसांनी केले आहे

हिमायतनगर पोलीस ठाणे हद्दीत गंभीर दखलपात्र गुन्हे असलेल्या 14 जणांन विरोधात प्रस्ताव तयार करून त्यांना दि 27 सप्टेंबर 2023 व 29 सप्टेंबर 2023 या काळात शहरातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे येत्या काही दिवसात श्री गणेश उत्सवाच्या मिरवणुका असल्याने हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे गंभीर गुन्हे असलेल्या चौदा जणांच्या प्रस्तावास उपविभागीय दंडाधिकारी हदगाव यांनी पारित करून त्यांना हद्दपार केल्याची कारवाई केली असून ह्या आरोपींना जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले आहे ज्याआर्थी नमूद केलेल्या उत्सवात हद्दपारीच्या गुन्ह्यातील आरोपींनी या उत्सवात भाग घेतल्यास त्यांच्यामुळे शहरातील सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी अरुणा संगेवार मॅडम यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2 )अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून हिमायतनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गंभीर गुन्हे असलेल्या 14 जणांविरोधात हिमायतनगर शहरातून दिनांक 27 सप्टेंबर रोजीच्या सकाळी सात वाजेपासून दिनांक 29 सप्टेंबर रोजीच्या सकाळी दहा वाजेपर्यंत कुठल्याही उत्सवात भाग घेण्यास बंदी घातलेली आहे असा आदेश त्यांनी जारी करून हिमायतनगर पोलिसानं सह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक चिखलीकर यांना आदेशित करून माहिती दिली त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी सबंधित आरोपींच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे व सन उत्सव काळामध्ये शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने हिमायतनगर पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत 14 जणांना हदपार केल्याची धाडसी कारवाई केली आहे त्यामुळे निश्चितच हिमायतनगर शहरासह तालुक्यात गुन्हेगारी कमी होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.