
हिमायतनगर प्रतिनिधी /-येथील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्त्वात आज दिनांक एक ऑगस्ट रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील कनकेश्वर मंदिर तलावाचा परिसर स्वच्छ करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली…

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार यांनी असे सांगितले की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या आदेशावरून संपूर्ण भारतात विश्वगौरव सेवा पंधरवाडा निमित्त ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचे आव्हान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी कडून करण्यात आले आहे त्या आदेशाचे आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त शहरातील कनकेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करून तेथील मंदिर परिसर स्वच्छ करून सर्व भारतीय जनता पार्टीच्या तालुका पदाधिकारी व शक्ति केंद्रप्रमुख बुत प्रमुख या सर्व भाजपा पार्टीच्या परिवारातील कार्यकर्त्यांनी येथील परिसर स्वच्छ करून घ्या मोहिमेसाठी यशस्वी असे योगदान देऊन हा परिसर स्वच्छ केला त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आप आपला परिसर स्वच्छ करून ही मोहीम यशस्वी करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले त्यानंतर उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गजानन चायल, प्रतिष्ठित व्यापारी किशोर रायेवार,रुपेश नाईक, विपुल दंडेवाड, कल्याण ठाकूर गजानन पिंपळे, दुर्गेश मंडोजवार,राहुल नरवाडे, शितल सेवन कर परमेश्वर नागेवाड,सदानंद काळे,संतोष चव्हाण,शंकर चव्हाण, सह असंख्य भाजप कार्यकर्ते व युवा मोर्चा चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते