हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- येथील ग्रामीण रुग्णालय येथे आज दि 21 जून रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही.सी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील कर्मचारी तथा योगगुरु रमेश धांडे पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना आज सकाळी योगासनांची माहिती देत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला..

या बाबत सविस्तर वृत्त असे की दि 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व नागरिकांना पटवून देणे ही काळाची गरज आहे म्हणूनच 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले होते म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्यात येतो असे अनमोल मार्गदर्शन योग गुरू रमेश धांडे पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्हीं.सी. जाधव व डॉ.डी.डी.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…