
👉🏻लोक सहभागातून स्मशानभूमीचा विकास करणार
हिमायतनगर प्रतिनिधी /-शहरातील लकडोबा चौक येथील हिंदू स्मशान भूमीची अत्यंत दैनिय अवस्था झाल्याचे समजताच परमेश्वर गल्ली, लकडोबा चौक सह येथील समाजबांधवांनी येथील वैकुंठ स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी एक समिती गठीत करून या वैकुंठ स्मशानभूमीचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडा गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उचलला आहे त्याच अनुषंगाने उद्या दिनांक एक ऑगस्ट रोजी वैकुंठ स्मशान भूमी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छाजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी वैकुंठा स्मशान भूमी परिवारातील सर्व सदस्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्मशान भूमी समितीकडून करण्यात आले आहे

हिमायतनगर शहरातील हिंदू समशानभूमी लाकडोबा चौक येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची लाईट, पाणी व स्वच्छते अभावी मोठी गैरसोय होत होती नुकतेच हिमायतनगर शहरातील पत्रकार स्व .परमेश्वर शिंदे यांचे निधन झाले होते तेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी गावातील प्रमुख नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तेव्हा अनेकांना येथील वाढलेल्या गांजर गावाताचा कैर कचऱ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता त्यामुळे येथील सुजाण नागरिकांनी या वैकुंठ स्मशान भूमी ची एक समिती गठीत करून या येणाऱ्या काळात संशानभूमीचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय एकमताने घेत ठिकठिकाणच्या स्म शान भूमीची पाहणी करून येथे कशा प्रकारे लोकं वर्गणीतून, स्व खर्चाने सुविधा देता येईल ह्यासाठी ते वेळोवेळी परिश्रम घेत आहेत व दर रविवारी येथील समशानभूमीची साफसफाई व कैर कचरा काढण्याचे काम येथील समितीकडून करण्यात येत आहे त्यासाठी गावातील नागरिकांनी उद्या दिनांक एक ऑगस्ट रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वछांजली कार्यक्रमाचे आयोजन करून येथील परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय वैकुंठ समशानभूमी समितीकडून घेण्यात आला आहे यासाठी या परिसरातील नागरिकांनी व वैकुंठ समशान भूमी समितीमधील नागरिकांनी उद्या सकाळी ठीक सहा वाजता सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान प्रसार माध्यमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे…