हिमायतनगर प्रतिनिधी/- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय आज दि 25 जुलै रोजी हिमायतनगर (परिक्षा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ मोठ्या आनंदात संपन्न झाला.

यावेळी महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भुषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.हनुमंत रघुनाथ आगलावे (प्राचार्य लोकमान्य महाविद्यालय सोनखेड) हे लाभले होते. तसेेच श्री. परमेश्वर गोपतवाड (दै.देशोन्नती तालुका प्रतिनिधी हिमायतनगर), श्री. अनिल मादसवार (संचालक नांदेड न्यूज लाईव्ह) व श्री. गजानन चायल (प्रमुख, माजी विद्यार्थी संघटना हु. ज. पा. महाविद्यालय) यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यासपीठावर डाॅ. एल.बी.डोंगरे (CDC सदस्य), डाॅ. डी.के.कदम (,Staff Secretaty), डाॅ. जी.पी.दगडे (NAAC Coordinator), डाॅ.डी.के.माने (क्रिडा संचालक), डाॅ.एस.एन.भदरगे (NSS कार्यक्रमाधिकारी), डाॅ.सविता बोंढारे (सांस्कृतिक विभाग), प्रा. एम.पी. गुंडाळे (परिक्षा विभाग) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख डॉ. सय्यद जलील सर यानी मांडले. प्रमुख पाहुणे डाॅ.हनुमंत आगलावे सर यांनी यशस्वी पदवीधारकांना शुभेच्छा देताना त्यांनी इथेच न थांबता आजच्या काळानुरूप आवश्यक शिक्षण घेऊन यशस्वी होण्याचा सल्ला दिला.
मा. प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यानी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात यशस्वी पदवीधरांचे भरभरून कौतुक केले. तसेच किती विद्यार्थ्यांनी इथेच न थांबता या व इतर महाविद्यालयात आणि विद्यापीठात आपले पुढील शिक्षण घेत आहेत याचा लेखा-जोखा मांडला. याचे संपूर्ण श्रेय त्यांनी सर्व प्राध्यापकांना दिले व आपल्या प्राध्यापकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यशस्वी वाटचाल करण्याच्या शुभेच्छां विद्यार्थ्यांना दिल्या. या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये उत्तीर्ण झालेल्या B.A., B.Com., B.Sc. व M.A. च्या पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. एकूण 148 पदवीधारकाना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. के. मगर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डाॅ. के बी पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.