गडचिरोली : 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रूपयाची लाच घेणार्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड वनविभागातील एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनरक्षकास अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द एटापल्ली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनिराम अंताराम पोरेटी (33) असे लाच घेणार्या वनरक्षकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे रेतीचे वाहतूक करणारे दोन ट्रक्टर पकडून कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून 30000 लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती 15000 लाच रक्कम तक्रारदाराकडून स्विकारतांना रंगेहाथ मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आले आहे.
नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले पोलिस हवालदार नथ्थु धोटे, पोलिस अंमलदार राजेश पद्मगिरवार, स्वप्निल बांबोळे, किशोर ठाकुर, संदिप उडान, संदीप घोरमोडे, चालक पोलिस हवालदार अंगडवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड