नांदेड दि.३१ : दक्षिणचा आमदार असताना किवळा प्रकल्पाला मंजुरी आणुन दिल्यानंतर हा प्रकल्प गतवर्षी पूर्ण झाल असुन यावर्षी जलसंपदा विभागाने तलावांत पाणी साठवण करुन महनगरपालिकेने नांदेडकरांसाठी सदरील तलावाचे पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी केली आहे या आशयांचे निवेदन त्यानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे.
नांदेड शहरापासुन अवघ्या कि.मी. अंतरावर असणारे किवळा साठवण तलाव हे नव्याने आता वापरण्यासाठी तयार झाले आहे आणि जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाने याची पाहणी करुन हे तलाव आता शंभर टक्के पुर्णत्वास आले आहे. २००९ मध्ये मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणुन किवळा साठवण तलाव मंजुर केला होता याचा सर्वाधिक फायदा नांदेड शहराला होणार आहे या तलावामुळे नांदेड दक्षिण मधील वाघाळा, सिडको, हडको, गोपाळचावडी, बळीरामपुर, धनेगांव, वाजेगांव यासह देगलुर नाक्या पासुन अलीकडच्या भागास या किवळा साठवण तलवाच्या पाण्याच्या लाभ मिळणार आहे.
याबरोबर नांदेड शहराजवळील सिंचनासाठी तसेच ग्रामीण पुरवठा योजनेसाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो पण या तलावाची उंची अजुन १.५ मीटरने वाढविल्यानंतर या तलावात तीस टक्के अधिकचे पाणी साठविता येते. विष्णुपुरी प्रकल्पाच्या जवळ असल्यामुळे आणि तलावाच्या शेजारुन कॅनल जात असल्याने हा तलाव गोदावरी नदीच्या पावसाळयातील वाहुन जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याने पुर्ण क्षमतेने भरुन घेता येतो यासाठी जलसंपदा विभागाने हा तलाव येणाऱ्या पावसाळयात पुर्ण क्षमतेने भरुन घेण्यात यावा.
नांदेड वाघाळा महापालिकेने सदरील पाणी नागरिकांना उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी केली आहे. या आशयांच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री यांना प्रत्यक्ष भेटुन दिले आहे.असे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.