नांदेड दि.२जून :मूळचे महाराष्ट्राचे असलेले व सध्या तेलंगणात अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी कार्यरत असलेले महेश भागवत यांना डॉ डी वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
शासनाच्या सेवेत कार्यरत असताना फार कमी अधिकाऱ्यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट दिली जाते. पण सध्या तेलंगणा राज्यात अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था पदावर कार्यरत असणारे महेश भागवत यांना डी वाय पाटील विद्यापीठातर्फे ही मानद डॉक्टरेट एका भव्य समारंभात प्रदान केली आहे. भागवत हे मूळचे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आजवर अनेक लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे त्यातून विविध पदांसाठी सुमारे 2 हजार तरुणांची निवड झाली आहे. भागवत यांनी मानवी तस्करी या विषयात मोठे भरीव काम केले आहे. बालकामगार ya विषयावर देखील त्यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्व कामाची दखल घेत मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. यावेळी कुलपती डॉ पी डी पाटील, धन्या प्रसाद विद्यापीठाचे कुलपती डॉ सोमनाथ पाटील यांच्यासह तेलंगणा राज्याच्या मुख्य वन संरक्षक तथा महेश भागवत यांच्या सुविधा पत्नी सुनीता भागवत यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्तींची हजेरी होती. हा कार्यक्रम पुणे येथे 27 डिसेंबर रोजी पार पडला. तेलंगणा राज्यात महेश भागवत यांनी मराठी मित्र मंडळ स्थापन करून मराठी संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. तेलंगणा पोलिस मध्ये त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.