नांदेड दि.१५ जून : येथील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोर चौक परिसरातील वाडी रस्त्यावरील फरांदे पार्क येथील विविध नागरी समस्या व विकास कामांचा पाठपुरावा करण्याकरिता या भागातील रहिवाशांनी सर्वानुमते फरांदे पार्क विकास समितीची स्थापना करत सर्व रहिवाशांच्या सहमती नंतर आयएफबी चे अधिकृत विक्रेते कराळे सेल्सचे संचालक वसंत कराळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली तर जयप्रकाश लढा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
फरांदे पार्क हा शहरातील जुन्या विकसित वसाहतीपैकी एक भाग म्हणून ओळखला जातो या भागातील अनेक नागरिक समस्या आजही आहे तशाच कायम आहेत त्या नागरी समस्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करण्याकरिता कार्यशील कृती समितीची गरज लक्षात घेत रहिवाशांनी पुढाकार घेत फरांदे पार्क सार्वजनिक विकास कृती समितीचा आराखडा तयार करून या समितीवर याच भागातील रहिवाशांची अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव आणि सदस्य अशी कार्यकारणी घोषित केले आहे
या विकास कार्य समितीच्या वतीने या भागातील विविध प्रलंबित विकास कामांचा पाठपुरावा तसेच या भागातील नागरी समस्या व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना यासाठीचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती विकास कृती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत कराळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
समितीच्या घोषणे वेळी या भागातील रहिवासी असलेले डॉ प्रा राम जाधव, श्री जयराम वडजे, जगन्नाथ शंकरपुरे, श्री ओमप्रकाश लड्डा, श्री रवि हिवरे,सुदाम चव्हाण, श्री बाबूराव भाकरे, डॉ देशमुख, सुनिल, श्री लक्ष्मीकांत अपष्तबं, श्री दयानंद माने, श्री नामदेव माने, श्री गणपत डक, श्री निळकंठ जाधव, डॉ श्रीराम श्रीरामे, श्री तांदळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती
 
			














 
 
 
 
 
