नांदेड दि.१७ :२०१४ नंतरच्या आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय परिस्थितीची समीक्षा करताना सद्यस्थितीची भारतीयांना जाणीव करून देत महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेतील संदिग्धपणाला स्पष्ट करीत ” मत दान करण्यासाठी आहे ,विकण्यासाठी नाही, तरच लोकशाही वाचेल , ” असे सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे दिल्ली यांनी आपले परखड मत व्यक्त केले.
परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प “भारतीय लोकशाहीचे भवितव्य” या विषयावर गुंफण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून अशोक वानखेडे दिनांक १३ जुलै रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय ,नांदेड येथे बोलत होते. यापुढे बोलताना – बिहार राज्यातील २० % मतदार शासनाच्या प्रमाणपत्राच्या खेळात कमी होणार असून हाच प्रयोग संपूर्ण देशात सुरू होण्याची त्यांनी शक्यता वर्तवली. लोकसभेमध्ये मतदारांनी ४०५ चा आकडा पार होऊ दिला नाही. यावरून मतदार जागृत असल्याचे सांगत , “दे दान ( मत ), सुटे गिरान “असा नारा देत ,भारतीय लोकशाहीचे भविष्य उज्वल असल्याचे पत्रकार अशोक वानखेडे ( टायगर) यांनी विश्वास व्यक्त केला .
निजामाच्या जोखडातून मराठवाड्यातील आठ जिल्ह्याच्या जनतेला मुक्त करण्यासाठी चालवलेल्या चळवळीचे प्रणेते परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला प्रमुख वक्ते अशोक वानखेडे यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली . महेश देशमुख यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले . तर प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांनी प्रास्ताविकात त्यांचा परिचय व व्याख्यानाच्या विषयाची प्रासंगिकता यावर भाष्य केले. कार्यक्रमासाठी लोकसभेचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, माजी राज्यमंत्री किन्हाळकर ,पत्रकार प्रदीप नागापूरकर , प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, संविधानाचे पुरस्कर्ते प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत, प्राचार्य डॉक्टर राम जाधव, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई चव्हाण, प्राचार्य डॉक्टर मा .मा. जाधव, प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे ,प्राध्यापक गौतम दुधडे, डॉक्टर राम वाघमारे, वसंत भैय्या, प्राध्यापक व पत्रकार आदि सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक व राजकीय क्षेत्राशी संबंधित विविध मान्यवरांची उपस्थिती होती. शेवटी महेश देशमुख यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!