• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

Raj Thackeray And Devendra Fadnavis: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला

Satyaprabha News by Satyaprabha News
21 August 2025
in Top News, राजकीय
Raj Thackeray Meet Devendra Fadnavis
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Raj Thackeray And Devendra Fadnavis: मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Raj Thackeray Meet Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीसाठी पोहचले. नागरिकांच्या विविध प्रश्न घेऊन राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे पोहचले आहेत. मात्र काल बेस्ट पतपेढी निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आणि आजच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहचल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत (BEST Election) ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली उडवत टीकेची झोड उठवली होती. मात्र, भाजपचे नेते फक्त उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करताना दिसत होते. राज ठाकरे यांच्याबाबत त्यांच्या बोलण्यात सहानुभूती आणि सॉफ्ट कॉर्नर दिसून आला होता. एकाही भाजप नेत्याने राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची हिंमत केली नव्हती. त्यामुळे भाजपला राज ठाकरे अजूनही आपल्याकडे परततील, अशी आशा असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनीही भाजप आणि महायुतीकडे परत जाण्याचे दोर अजून पूर्णपणे तोडलेले नाहीत, अशी नवी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यापूर्वी शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असताना 12 जून रोजी वांद्र येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीत उभय नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर राज ठाकरे हे वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले होते. त्यानंतर शिवसेना आणि मनसे युतीच्या वाटाघाटींना वेग आला होता. मात्र, आता बेस्ट पतपेढी निवडणुकीतील दारुण पराभव आणि देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीने शिवसेना-मनसेच्या युतीच्या प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागणार का, हे बघावे लागेल.

सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता धुव्वा उडाला. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार ही निवडणूक जिंकले. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. मात्र ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे दोघंही टायमिंग साधण्यात माहिर आहेत. दोघांमध्ये भेट नेमकी कोणत्या विषयावर होतेय, याची माहिती राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसचं देऊ शकतात, असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले. तसेच राज ठाकरे महायुतीमध्ये यावेत, अशी आमची इच्छा आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?
विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले. त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर होऊ द्या, असं शिवसेना ठाकरे गटाते खासदार संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस अनेकदा भेटले आहेत. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा सुरू असेल, असं संजय राऊत म्हणाले.

Tags: Raj Thackeray Meet Devendra Fadnavisraj thackeray mnsSatyaprabha News
Previous Post

श्रावणमासा निमित्ताने मगनपुरा येथे सौ.सदिच्छा सोनी पाटील यांच्या पुढाकारातून महाप्रसादाचे आयोजन

Next Post

आतड्याला दुखापत, छिद्र पेरिटोनिटिस, बहु-अवयव निकामी उपचार एक आव्हान – डॉ.दुर्गेश साताळकर

Next Post
image editor output image 1837034463 1755753966336

आतड्याला दुखापत, छिद्र पेरिटोनिटिस, बहु-अवयव निकामी उपचार एक आव्हान - डॉ.दुर्गेश साताळकर

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • अर्शदीप सिंग पंजाब किंग्सच्या इतिहासात १०० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
.
#IPL2026 #ArshdeepSingh #SatyaprabhaNews
  • राज ठाकरे यांनी राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीवर टीका करताना म्हटले की, "आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही, पण खरातला पाणी आहे!"#RajThackeray #AshokKharatCase #MNS #SatyaprabhaNews #WaterCrisis FarmerIssues NashikNews
  • नारीशक्ती विधेयकामुळे देशाला नवी दिशा मिळणार,
विधेयकामुळे कोणत्याही राज्याचं नुकसान होणार नाही,
दक्षिणेतील राज्यांना कोणतंही नुकसान होणार नाही! : अमित शाह
.
#PriyankaGandhiVadra #SatyaprabhaNews #NarendraModi #AmitShah
  • महिलांच्या राजकीय आणि सामाजिक प्रगतीसाठी
  • पाच राज्यात निवडणुका असताना नारीशक्ती विधेयक आणणे गरजेचे नव्हते. मतदानातून हे विधेयक पाडले जाईल. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट#SanjayRaut #WomenReservationBill #SatyaprabhaNews #LatestNews #BJP
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Sai Tamhankar | Cute बिबट्या; सईच्या ‘त्या’ लुकवर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ… बिबट्या म्हणजेच चित्ता किंवा बिबट्याच्या प्रिंटवर आधारित फॅशन परत एकदा ट्रेंडमध्ये आहे. फॅशनच्या दुनियेत अॅनिमल प्रिंट्स कधीच पूर्णपणे आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत, पण काळानंतर ते नव्या स्टाइलमध्ये परत येतात. सई ताम्हणकरने हाच ट्रेंड अचूक पकडत चित्ताप्रिंट साडीमध्ये आपला लुक कॅरी केला. या साडीमध्ये लूक अत्यंत एलिगंट दिसतो. साडीचा प्रिंट क्लासी असला, तरी तिने त्याला बॅलन्स ठेवत मिनिमल मेकअप, अॅक्सेसरीज वापरले आहेत. तिचा लूक बिबट्या माणूस असता तर असा दिसला असता या कॅप्शनसह शेअर केला असून, चाहत्यांनीही प्रतिसाद दिला आहे. चित्ताप्रिंटसारख्या क्लासी डिझाइनला कॅरी करण्यासाठी आत्मविश्वास आणि योग्य अॅटिट्यूड लागतो. या साडीत सईचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. मोकळ्या साडीच्या स्टाइलने सई ताम्हणकरने आपला लुक अत्यंत आकर्षक आणि एलिगंट पद्धतीने पूर्ण केला आहे. साडीची हलकी, फ्लोई ड्रेपिंग तिच्या व्यक्तिमत्त्वाला नैसर्गिक उठाव देते, तर तिच्या आत्मविश्वासपूर्ण वावरामुळे संपूर्ण लुक अधिकच प्रभावी वाटतो. साधेपणा आणि स्टाइल यांचा सुंदर मिलाफ साधत तिने हा अंदाज साकारला असून, त्यामुळे तिचा क्लासी लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतो. फुलस्लिव्ज ब्लाऊजने सईचा लुक सुंदर बनवला आहे. साडीच्या चिता प्रिंटला संतुलित करत हा ब्लाऊज क्लासी वाटतो. साधा आणि फिट ब्लाऊज असल्यामुळे लुक स्वच्छ आणि आकर्षक दिसतो. फुलस्लिव्ज असल्यामुळे त्यात थोडा ट्रेडिशनल टच पण मिळतो, आणि तो मॉडर्न फॅशनसोबत छान जुळतो. चाहत्यांनी सईच्या लुकवर “Cute बिबट्या” असं कमेंट करून तिच्या स्टाइलला भरभरून पसंती दिली आहे. चिताप्रिंट साडी, ड्रेपिंग आणि सिंपल मेकअपने बनवलेला हा क्लासी लूक चाहत्यांना खूप आकर्षक वाटला. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ सुरू झाला आहे. #SaiTamhankar
#SatyaprabhaNews
  • ज्या प्रतिभा चाकणकर दर तीन दिवसांनी नथीआडून तीर मारत आहेत, त्या चाकणकर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत, तर चाकणकरांनी एकदा जाहीर पत्रकार परिषद घ्यावी. जो न्याय अमरावतीच्या परतवाड्यात बुलडोझर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. अशोक खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर चालवला जात नाही, याला कृपा आशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट
.
#SushmaAndhare #SatyaprabhaNews #RupaliChakankar #PratibhaChakankar #Maharashtra
  • “अशोक खरात यांना फोन कॉल करणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर दुसऱ्या नंबरवर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोढे, चौथ्या नंबरवर कल्पना, खरातांची बायको आहे.” – अंजली दमानिया
#AshokKharat #RupaliChakankar #SatyaprabhaNews #AnjaliDamania #DeepakLodhe BreakingNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10407
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6584
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1586
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज