नांदेड दि.२२ ऑक्टोबर :दिवाळिचा सण म्हटलं की सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतो परंतु दिव्यांग बांधवांमध्येही मोठ्या प्रमाणात दिवाळी या सणाचा आनंद द्विगणित व्हावा या उद्देशाने सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष यांनी कर्णबधिर,मूकबधिर दिव्यांगांना आपल्या घरी बोलावून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली,जागतिक कर्णबधिर दिन नुकताच साजरा करण्यात आला परंतु शहरासह जिल्ह्यातील काही दिव्यांग शाळेने तो साजरा केला तर काहींना विसर पडला याचेच औचित्य साधून व दिवाळीच्या निमित्ताने सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी मूकबधिर कर्णबधिर अशा 40 ते 50 जणांना घरी बोलाऊन दिवाळीनिमित्त त्यांना फराळ व मिठाई भरवून फटाके फोडुन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.

या उत्सवामुळे मूकबधिर कर्णबधीर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद फुललेला दिसत होता. संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी हा उपक्रम राबवून कर्णबधिर, मूकबधिर दिव्यांगांना दिवाळी सणानिमित्त बोलावून त्यांचा आनंद द्विगूणित करून कार्यक्रम केला यावेळी मूकबधिर. कर्णबधिर प्रमोद मांजरमकर, मोहम्मद माजीद अब्दुल रज्जाक, मोहम्मद वसिम,शेख शोएब, गजेंद्र दासरवार, सय्यद आरिफ, शेख आलिम शेख करीम, मोहमद मोईज अब्दुल अजीज, शेख मोहम्मद जहीर शेख रफिक, शेख आलमगिर गफार बागवान, सय्यद एजाज सय्यद आयुब,गुलाम मुद्दसिर गुलाम मुजहिद, अब्दुल जमीर अब्दुल अब्बास, मोहम्मद रफिक कुरेशी, अब्दुल रेहान अब्दुल रफिक, रज्जाक खुरेशी, अब्दुल नोविद अब्दुल हमीद खुरेशी, महमद उज्जेफ खाजा, मोहम्मद वसिम मोहमद बशीर, सय्यद अकबर हुसेन, सय्यद सलीम, शेख शोएब शेख खालेद, मोहम्मद सोहेल अब्दुल रऊफ, मोहम्मद शकील,आतिक हुसेन, सय्यद समिद, सय्यद हाकिम, शेख रसुल चौधरी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
त्यानंतर राहुल साळवे यांनी नुकतेच काही महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झालेले प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष कमलाकर टाकळीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.













