नांदेड दि.२४ ऑक्टोबर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्षितिज जाधव व मित्र मंडळाच्या वतीने महिला सफाई कामगारांना साडी- मिठाई वाटप करून त्यांना भाऊबीज निमित्त ओवाळणी देण्यात आली.
दीपावली निमित्त दरवर्षी भाजपाचे माजी सरचिटणीस क्षितिज जाधव, प्रवेशिका जाधव यांच्या वतीने महिला सफाई कामगारांना साडी- मिठाई वाटप करण्यात येते. यावर्षीचे हे सहावे वर्ष असून दि. 23 ऑक्टोबर रोजी श्रीनगर येथील हनुमान मंदिरात महिला सफाई कामगारांना भाजपाचे महानगराध्यक्ष, माजी आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते साडी- मिठाई वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, भाजपा सरचिटणीस विजय येवनकर, उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख, दक्षिण विधानसभा प्रमुख सचिन उमरेकर, यांच्यासह मोहनसिंह तौर, विजय गंभीरे, अनिलसिंह हजारी, अशिष नेरळकर, राजू यन्नम, मुकुंद धानोरकर, कैलास वडजे, कामाजी सरोदे, बागडिया यादव, अक्षय अमिलकंठवाड, गुरुदीपसिंह तौर यांची उपस्थिती होती.
भाजपा माजी सारचीटणीस क्षितिज जाधव हे दरवर्षी राबवित असलेल्या उपक्रमाचे माजी आमदार तथा महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांनी कौतुक केले. तर भाऊबीज निमित्त भावाकडून ओवाळणी मिळाल्याची भावना महिला सफाई कामगारांनी व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा कपाळे, राजे साखरे, उत्तम काकडे, विजय सरपाते, जनार्दन सरपाते, उद्धव पाटील, विजय जाधव, विलास देवळे, उत्तम तिडके, उमेश घुगे, प्रफुल कांबळे, विकी सोनकांबळे, गणेश शिंदे, आकाश लेवडे, दीपक कोकाटे, अरविंद गोधणे, संतोष गवळी आदींनी परिश्रम घेतले.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













