गजानन राऊत
मेहकर दि. २८ ऑक्टोबर : मेहकर डोणगाव रोडवर खंडाळा येथील सत्यजित कॉलेजसमोर आज सकाळी १० ते ११ च्या दरम्यान अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.
डोणगाव कडून मेहकरच्या दिशेने मोटरसायकल वर दोन युवक येत असताना अचानक मधे जनावरे आडवे आल्यामुळे मोटरसायकल वरील युवक जागीच ठार तर एक गंभीर जखमी. दुचाकी वरील युवक वसारीचा असल्याची माहिती आहे मोटरसायकल क्रमांक (MH.28-AW,2745] या मोटरसायकल समोर अचानक जनावर आडवे आल्याने दुचाकीवरील युवकाचा ताबा सुटला असल्याची माहिती समोर आली आहे जनावरे आडवे आल्याने दुचाकीवरील युवकांचा ताबा सुटला.

असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली दुचाकी वरील दोन युवक दहा ते वीस फूट लांब पडल्या मुळे . या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकास गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
हा युवक गंभीर असुन उपचार सुरू आहे हा एक विचित्र अपघात असुन जनावरे अडवे आल्याने असा अपघात होत नाही कोणत्याही अदन्यात व्यक्ती ने उडवून पसार झाल्याच नातेवाईकांच म्हणं आहे
अपघातस्थळी मेहकर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास मेहकर पोलिसांन कडून सुरू आहे.














