हदगाव प्रतिनिधी | तुषार कांबळे | हदगाव शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; परिवर्तनाच्या लढ्यासाठी सर्व जातीधर्मांना एकत्र आणण्याचा संकल्प
गर्जनादायी मेळावा! कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; “आरक्षणवादींनी आरक्षणवाद्यालाच मतदान करावे” या घोषणेने वातावरण दणाणले
स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील एकत्रित बैठकीस जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हदगाव येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या या बैठकीस कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा तुफान उत्साह पाहायला मिळाला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे पालमकर हे होते. जिल्हा कमिटीतील पदाधिकारी महासचिव राम माळाकोळीकर, देवानंद पाईकराव(सचिव), उपाध्यक्ष राम नरवाडे, मीडिया प्रमुख अमर हत्तीआंबिरे, रावसाहेब कदम, योगेश लव्हाळे आणि काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका अध्यक्ष हितायत खान पठाण व त्यांची संपूर्ण कमिटी तसेच हिमायतनगर तालुक्यातील अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले. उमेदवारांच्या मुलाखती, कार्यकर्त्यांच्या अडचणी, निवडणुकीतील रणनीती आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा सत्तेवर फडकवण्याचा संकल्प सर्वांनी केला.
जिल्हाध्यक्ष हत्तीआंबिरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,
“स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वंचितांची ताकद दाखवून द्यायची आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर — शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, पारदर्शक योजना — यांवर आधारित जनआंदोलन उभारून परिवर्तन घडवायचे आहे. आरक्षणवाद्यांनी आरक्षणवादींनाच मतदान करणे आवश्यक आहे!”
बैठकीत ठरविण्यात आले की, सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. सक्रिय सभासद नोंदणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असून, समविचारी पक्षांसोबत युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविरुद्ध तीव्र लढा देण्याचा सूर बैठकीतून उमटला.
बैठकीचे उत्तम नियोजन देवानंद पाईकराव आणि हितायत खान पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप दवणे तालुका महासचिव यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश मुनेश्वर उपाध्यक्ष यांनी मानले.
शेवटी “वंचित बहुजन आघाडीचा विजय असो!” या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. महिलांचा लक्षणीय सहभाग आणि तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह उल्लेखनीय होता. जिल्हाध्यक्ष हत्तीआंबिरे यांनी संयोजकांचे कौतुक करत सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की — “स्थानिक स्वराज्यात संविधानाची मोहर उमटवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आता जनतेच्या दारात जाऊन परिवर्तनाचे काम सुरू करावे!”
वंचित बहुजन आघाडीचा जोश आणि जनाधार पाहता, नांदेड जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आणखी वेग घेणार हे स्पष्ट झाले आहे. कार्यक्रमास प्रामुख्याने ओबीसी नेते बालाजी खरडे बौद्ध महासभेच्या तालुकाअध्यक्षा पौर्णिमाताई सावते, तालुका कार्यकारणी पदाधिकारी संजय कांबळे,नथुराम चौरे,मुकींदा नरवाडे,दशरथ हिव्हाळे,दादाराव टारपे,अशोक हुर्दुके, दिलीपराव ढोले, विश्वनाथ वानखेडे रविराज नरवाडे, रंजीत बगाटे,ज्ञानेश्वर थोरात,तळणी येथील जेष्ठ कार्यकर्ते विजय लोखंडे, सुहास अर्धापूरे, निवृत्ती भालेराव, जिल्हा युवा पदाधिकारी अभिलाष लोखंडे, प्रकाश कांबळे कचरू वाढवे,अनंता कांबळे,ॲड संतोष पाईकराव,बाबूराव टीब्बे,विलास भालेराव,कबीरदास कदम युवा पदाधिकारी जमीन रावळे,सुशील भालेराव,विशाल पाईकराव,राजरतन मुनेश्वर,जनार्दन नरवाडे,हिमायतनगर तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी राजू वाठोरे,डॉ रविराज दुधकावडे,रमेश खिल्लारे,गणेश मुनेश्वर,मनोज हरणे संजीव मुनेश्वर, तुकाराम मुनेश्वर, संतोष झगडे,सुनील सर्जेराव,हर्षवर्धन मुनेश्वर,सुनील गवते कपिल वायवळ सह महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.