तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगावात शहरातील ( Hadgaon News) राठी चौक बौद्ध नगर परिसरातील येथे सर्रास अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळे शहरातील गल्लीबोळातील अवैध दारू विक्रेत्यांचे चांगले दिवस आले आहे. दरम्यान राठी चौक परिसरातील गजबजलेल्या केअर हॉस्पिटल समोरील दारू विक्रेत्याला कठोर कार्यवाही करण्याची मागणी येथील केअर हॉस्पिटल दवाखाना परिसरातील स्टाफ वर्ग व इथल्या नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.
राठी चौक केअर हॉस्पिटल समोरील सर्वसामान्यांना ये जा करण्यासाठी आता शाळकरी मुले व महिलांना इथल्या दारुडे अश्लील हावभाव चाळे करत असल्याने निर्देशनात आले आहे. या ठिकाणी एका खोलीमध्ये केअर हॉस्पिटल परिसरातील खुलेआम अवैध देशी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष बाब म्हणजे याच अवैध देशी दारू विक्री समोरील पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन पथक समोरून जात असल्याने हदगाव पोलीस प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचीही चर्चा आहे. या अवैध देशी दारू दुकान थाटलेल्या तळीरामांच्या त्रासाला इथल्या अनेक महिलांना सामोरे जावे लागते, तसेच राठी चौक परिसर येथील कोचिंग क्लासेस शहरातील नामांकित केअर हॉस्पिटल स्टॉप वर्ग या बाबींनी त्रस्त आहे.
मात्र जिल्हा उत्पादन शुल्क विभाग स्थानिक पोलीस प्रशासनाचे कोणतेही ठोस कार्यवाही या विक्रेत्यावर होत नाही. तरीही हदगाव पोलीस ठाण्याकडून अवैध देशी दारू विक्रेत्यावर कठोर कार्यवाही करावी व हदगाव शहर दारूमुक्त करण्यात यावे अशी मागणी शहर वासियांकडून होत आहे.