तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव नगरपालिका (Hadgaon Nagarpalika) निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून आज दि.१५/११/२०२५. रोजी अपक्ष उमेदवार शहनाज अयुब खान पठाण यांनी अपक्ष पदाचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आले असून हदगाव शहरातील प्रभाग दोन मधून ते इच्छुक उमेदवार होते. प्रभाग दोन मधील अपक्ष उमेदवार शहनाज अयुब खान पठाण यांचा नामांकन अर्ज दाखल होताच प्रभाग दोन मधून राजकीय घडामोडीला वेग दिसून येत आहे. तसेच इथल्या राजकीय समीकरणात बदल होताना दिसत आहे.
शहनाज अयुब खान पठाण यांची ओळख प्रमाणिक मनमिळाव आणि जनतेचे थेट संपर्क ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची आहे. स्वतः प्रभाग दोन मधून त्यांचा माहेरघर असल्यामुळे. याच प्रभागांमधून त्यांचे मोठे नातेवाईक आहेत. तगडा जनसंपर्क असल्याने तसेच पत्रकार सलमान पठाण त्या आई असल्याने पत्रकाराच्या माध्यमातून वार्डातील विविध प्रकारच्या गोरगरिबांसाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सेवांचा दर्जा सातत्याने रस्ते नाली यासारख्या अनेक प्रभागातील समस्या मार्गी लावले आहेत. स्थानिक पातळीवर सक्रिय आणि शांत स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांचा अर्जाने हदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग दोन मधून वेगळीच चुरस निर्माण झाली असल्याने यंदाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार शहनाज अयुब खान पठाण या निवडणुकीत सज्ज असल्याचेही दिसून येत आहे.