हिमायतनगर प्रतिनिधी | Himayatnagar News | नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक घडामोडी घडत असल्याचे चित्र सध्या शहरात घडताना दिसून येत आहेत या निवडणुकीत भाजप/ शिंदे शिवसेनेची युती अधिकृत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 1 नगराध्यक्ष व 54 सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी टेमकर यांनी दिली.
हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज मातब्बर नेते निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे सध्या दिसून येत आहे पण नुकतेच हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांनी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते भाजपा प्रवेश केल्यामुळे त्यांची महायुतीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याचे समजत आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडून जनतेच्या मनातील माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू कार्यकर्ते रफिक भाई यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे काँग्रेच्या गटात बोलल्या जात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गणी हे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाहीर केले आहे.
त्यामुळे हिमायतनगर शहरात सध्या तीन मातब्बर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असल्याचे बोलल्या जात आहे पण डॉक्टर वानखेडे यांच्या प्रवेशाने शहरातील अनेक मातब्बराचे राजकीय समीकरण बिघडल्याचे सध्या दिसून येत आहे त्यामुळे नामनिर्देशन भरण्याच्या सातव्या दिवशी 8 नगराध्यक्ष पदासाठी व सदस्य पदासाठी 102 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी टेमकर यांनी दिली आहे.