Maharashtra Local Body Election Voting Updates: राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज, मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. Maharashtra Local Body Elections 2025
राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज, मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान होत असून मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अखेर आज होत आहेत. यामध्ये एकूण 226 नगरपरिषद आणि 38 नगरपंचायतींसाठी मतदान सकाळी 7.30 वाजता सुरू झाले आहे. दरम्यान, 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली असून आता मतदारांचा कौल कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार मार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.