नवले पुलावरील संथ वाहतूक, पायाभूत सुविधांचा बोजड भार आणि प्रशासनाची निष्क्रियता—याच सगळ्याचा ताण कात्रजकडे पडत असताना हा थरारक प्रसंग घडला…!
पुणे दि११: कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीचा वास्तव चेहरा दाखवण्यासाठी उबाठा शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे आपल्या सहकाऱ्यांसह पुणे-सातारा महामार्गावरून लाईव्ह करत होते. नवले पुलावरील वाहतूक ठप्प, त्याचा ताण कात्रजकडे. अशी बिकट परिस्थिती ते प्रत्यक्ष दाखवत असतानाच एक भरधाव कार विजेच्या वेगाने त्यांच्या अगदी जवळून झेपावली. क्षणभरात घडलेला हा प्रसंग इतका अचानक होता की, मोरे आणि त्यांचे सहकारी थरारून गेले, अपघात टळला तो अक्षरशः केसाने!लाईव्ह मध्येच मोरेंनी आवाज दाबत सांगितले, “हा रस्ता गरीबांना जीवावर उठला आहे. एखादा मोठा मंत्रीच या रस्त्यावर मरण पावला तरच इथे मरण पावलेल्या आत्म्याला शांती मिळेल. कारण गरीबाच्या जीवाला किंमतच नाही!” नवले पुलावरील मंदावलेली वाहतूक, कात्रजकडे कोसळलेला ताण आणि प्रशासनाची उदासीनता, या सगळ्याचा ऐन लाईव्ह मध्ये झाला असलेला हा ‘डेथ टच’ प्रकार महामार्गावरील बेजबाबदार वेगाचे आणि असमाधानी पायाभूत सुविधांचे भीषण चित्र उघड करत आहे.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनीही प्रश्न केला, “दररोज अपघात, दररोज मृत्यू, पण उपाय मात्र काहीच नाही! आणखी किती लोकांनी मरावं?” हा प्रश्न उद्भवतो. कात्रज-नवले पुल परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभं झालं आहे. वसंत मोरे यांच्यावर आलेला हा जीवघेणा प्रसंग प्रशासनाला जाग येण्यासाठी पुरेसा ठरेल का, हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.











