तुषार कांबळे !हदगाव प्रतिनिधी !
हदगाव शहरातील गटशिक्षणाधिकारी व हदगाव आगार च्या भिंतीला लागूनच न्यायप्रविष्ठ देशी दारू दुकान स्थानांतर करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे मालमत्ताधारक बाबासेठ अन्सारी यांच्यासह हदगावच्या नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नांदेड यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र देशी मद्य नियम १९७३ मधील नियम २५ (अ) अन्वये अर्जदार श्रीमती मीरा रामनाथ शेणॉय वय ६५ वर्षे व्यवसाय अनुज्ञप्तीधारिका मे. रुची देशी बार देशी दारू किरकोळ विक्री दुकान १४० खार महानगर पालिका खार (प) मुंबई ही अनुज्ञप्ती हदगाव नगर परिषदेमध्ये श्री. बालाजी रमेशराव घंटलवार वय-३० वर्षे रा. तामसा ता. हदगाव जि. नांदेड यांच्या मालकी व ताब्यात असलेल्या कार्यालय नगरपरिषद हदगाव ता. हदगाव जि. नांदेड हद्दीतील गट नं-२३५/१ मधील मालमत्ता क्र.५५५ मध्ये मागील वर्षी स्थलांतरित करण्यात आलेली आहे.

हा देशी दारू परवाना ज्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे त्या इमारतीसाठी नगर परिषद हदगाव यांनी दिलेली बांधकाम परवानगी बेकायदेशीर असून ऑनलाईन परवाना घेण्याची तरतूद असतांना ऑफलाईन बांधकाम परवाना दिला. प्रस्तावित बांधकाम परवानगी पुर्ण झाले बाबत बोगस प्रमाणपत्र सुद्धा दिले. नगर परिषद हदगाव द्वारे निर्गमित केलेले गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाणपत्र सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसवून दिलेले आहे. इत्यादी मुद्दे आपल्या तक्रारीत
तक्रारदार बाबा अंसारी यांनी नमूद केले आहेत. हदगांव शहरातील तामसा रोडवरील शेत सर्व्हे नं. २३५/१ मधील मालमत्ता क्रमांक ५५५, ५५६ ही या इमारतीमध्ये पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालय, गटशिक्षण साधन केंद्र इत्यादी इमारती आहेत. सदर इमारत ही शासकीय कार्यालयाची असून त्यांच्या ताब्यात आहे. करीता दिनांक ०९ मार्च २०१२ रोजी दुय्यम निबंधक हदगांव, मुख्याधिकारी नगर परिषद हदगांव, मंडळ अधिकारी हदगांव, तलाठी सज्जा हदगांव यांना कळविण्यात आले. परंतू तात्कालीन मुख्याधिकारी यांनी हदगांव नगर परिषद प्रशासक आसल्याने आपल्या पदाचा गैरफायदा घेवून देशी दारू मालक यांच्यासोबत अर्थिक संगणमत करून मे. रूची देशी बार सी.एल. श्री. क्रमांक १४० हे देशी दारू दुकान बांधकाम व देशी दारू दुकान चालु करण्यास दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी ना हरकत परवाना देवून कायद्याचे उल्लंघन केले आसल्याने तात्कालीन मुख्याधिकारी व या प्रकरणातील ईतर सर्व संबधित यांच्यावर योग्य ती कारवाही करून सदरच्या ठिकाणी चालु असलेली देशी दारू दुकान बंद करण्यात यावे. अशी मागणी करणारे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्यावतीने के.डी. पवार यांनी दिली आहे. परवाना रद्द नाही केल्यास लोकशाही मार्गाने लहुजी शक्ती सेना या संघटनेच्यावतीने दिनांक २२ डिसेंबर रोजी पासून आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनकर्त्यांने आपल्या निवेदनातून उपविभागीय अधिकारी हदगाव यांना दिला,












