श्रीनिवास बोंपीलवार | हिमायतनगर (प्रतिनिधी)| हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचा (Himayatnagar Local Body Election) निकाल रविवारी २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला असून, यामध्ये माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा करिश्मा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार शेख रफिक शेख महेबुब यांनी भाजपा उमेदवाराचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. (Himayatnagar Nagar Panchayat Election Result)
काँग्रेसला बहुमत, भाजपा-शिंदे सेनेला फटका या निवडणुकीत १७ जागांपैकी काँग्रेसचे सर्वाधिक ८ नगरसेवक विजयी झाले आहेत. यामुळे सलग दुसऱ्यांदा नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. दुसरीकडे भाजपा नेते अशोक चव्हाण आणि शिंदे सेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. शिंदे शिवसेनेला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. (Himayatnagar Nagar Panchayat Election Result)
पक्षनिहाय विजयी नगरसेवक संख्या:
1. काँग्रेस: ०८
2. भाजपा: ०३
3. शिवसेना (उबाठा): ०३
4. शिंदे शिवसेना: ०२
5. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): ०१ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.)
विजयी उमेदवारांची नावे:
वार्ड क्रमांक १: दर्शना शरद चायल (भाजपा)
वार्ड क्रमांक २: विनोद गुंडेवार (काँग्रेस)
वार्ड क्रमांक ३: अब्दुल कंजुल फिरदौस हक्क (काँग्रेस)
वार्ड क्रमांक ४: कमल मेंडके (काँग्रेस)
वार्ड क्रमांक ५: हसिना बेगम अब्दुल सलाम (काँग्रेस)
वार्ड क्रमांक ६: अरुणा भगवान मुद्देवाड (शिंदे शिवसेना)
वार्ड क्रमांक ७: दर्शना पंडित (काँग्रेस)
वार्ड क्रमांक ८: मिर्झा जिशान बेग मिर्झा इसा बेग (शिवसेना – उबाठा)
वार्ड क्रमांक ९: सुचिता कुणाल राठोड (शिवसेना – उबाठा)
वार्ड क्रमांक १०: आशिष सकवान (भाजपा)
वार्ड क्रमांक ११: भारत डाके (भाजपा)
वार्ड क्रमांक १२: विठ्ठल ठाकरे (शिवसेना – उबाठा)
वार्ड क्रमांक १३: सरदार खान खलील खान पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
वार्ड क्रमांक १४: म. मुजतबा मतीन (काँग्रेस)
वार्ड क्रमांक १५: शेख सलमा बी इलियास (काँग्रेस)
वार्ड क्रमांक १६: सलमा खानम समद खान (काँग्रेस)
वार्ड क्रमांक १७: सुभाष बलपेलवाड (शिंदे शिवसेना)
.












