तुषार कांबळे हदगाव/नांदेड

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे हरभरा महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस उपस्थित तालुका कृषि अधिकारी श्री. सदाशिव पाटील, मंडळ कृषि अधिकारी श्री. अशोक भिसे, सहा.कृषी.अधिकारी श्रीमती कल्पना गायकवाड ,तालुका तंत्रज्ञान अधिकारी शेखर कदम, समूह सहाय्यक अविनाश मस्के, गावचे सरपंच भिकाजी सूर्यवंशी, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मुरलीधर ढाके, कृषी ताई पुष्पांजली दीपक सूर्यवंशी, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी पाटील बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा -2(पोखरा) या योजनेची सर्व माहिती उदाहरणार्थ : ठिबक संच , तुषार संच, शेततळे, मच्छी पालन , तुती लागवड, फळबाग लावगड, कुक्कुटपालन, शेळीपालन, अशा विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना किती अनुदान आहे आणि कोणकोणत्या योजना आहेत हे पटवून देत महाविस्तार ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून सविस्तर माहिती मिळवून घ्यावी जेणेकरून संपूर्ण माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल महाविस्तार ॲप डाऊनलोड करून घ्यावे व या योजनेचा संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल असे प्रतिपादन यावेळी बोलताना केले आणि विशेषता कृषी अधिकारी यांनी जलतारा विषयी सखोल माहिती देऊन पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश शेतकऱ्यांना दिला व जलतारामुळे आपल्या शेतीला कसा फायदा होईल याचे सुद्धा शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिले. आणि शासनाकडून सुद्धा आर्थिक मदत होईल असे बोलताना सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन दीपक सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन शंकर शेटे यांनी केले व आभार प्रदर्शन सहा.कृषि अधिकारी श्रीमती .कल्पना गायकवाड यांनी केले.
## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##

कृषी अधिकारी सदाशिव पाटील समवेत हरभरा कृषी शाळा व संबंधित कृषी अधिकारी व शेतकरी महिला व पुरुष उपस्थित












