अमेरिका आणि इराण यांच्याती शांतता करारावर सहमती झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या घोषणचा परिणाम आशियाई शेअर बाजारात दिसून आला. गिफ्ट निफ्टी 227 अंकांच्या तेजीसह 23922 वर पोहोचला. यामुळं भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीत तुफान तेजी येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सेन्सेक्स 76000 च्या वर ओपन होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्याची प्रक्रिया सुरु होताच क्रूड ऑईलच्या दरात घसरण झाली आहे. दक्षिण कोरियातील कोस्पी निर्देशांकात 5.2 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टरच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. एआय सेक्टरमधील नफावसुलीमुळं दबावात असलेल्या बाजाराला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
जपानचा प्रमुख निर्देशांक निक्केई 225 सुरुवातीच्या बाजारात 4 टक्क्यांनी वधारला. तर, टॉपिक्स निर्देशांकात 2.3 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. इलेक्ट्रॉनिक्स, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारावर 19 जूनला स्वाक्षरी होणार आहे. करारातील अटींची अंमलबजावणी झाल्यास क्रूड ऑईलचे दर कमी राहतील. याचा फायदा भारताला देखील होणार आहे. तेलाचे दर घटल्यानं शेअर बाजारात तेजी पाहायला मिळू शकतो.