तुषार कांबळे (हदगाव प्रतिनिधी)
दि. ०९ फेब्रुवारी २०२६

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले त्या ग्राम सभेमध्ये उपस्थित ग्रामसेवक सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते विकास कामे झाली, किती निधी आला, किती वापरला यासंदर्भात गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच गावातील रस्ते, पाणी, लाईट व स्मशानभूमी या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरासन केले. तसेच संबंधित स्मशानभूमी ही गट क्रमांक 33 मध्ये झाली पाहिजे या आशयाचे पत्र सर्व गावकऱ्यांनी ग्रामसेवक यांना दिले. यावर विचार करून गायरान जमिनीवरील स्मशानभूमीचे काम थांबवण्यात येईल. असे माध्यमांशी बोलताना सांगितले. गावांमध्ये होणारे कामे हे आपल्या सर्वांना विचारात घेऊन करण्यात येईल असे आश्वासन दिले व मागील चार वर्षाच्या काळातील उपसरपंच प्रतिनिधी संदीप पवार यांनी त्यांच्या चार वर्षाच्या कार्य काळामध्ये जी कामे केली ती सर्वांसमोर मांडली यावेळी आणि पूर्णत्वास नेली असे माध्यमांशी बोलताना सांगितलं ग्रामसेवक यांनी सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन केले .
## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##












