हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा दि 27 जुलै रोजी वाढदिवस व त्यासोबतच हदगावचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांचा सुद्धा वाढदिवस असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोटा येथील युवा सेना तालुका संघटक संतोष पुलेवार यांनी त्यांच्या परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन येथील टेकडीवर असलेल्या महादेवाचा जल अभिषेक करून उद्धव ठाकरे व माजी आमदार नागेश पाटील यांना दीर्घ आयुष लाभो अशी प्रार्थना करत अनेक उपक्रमानी त्यांचा वाढदिवस साजरा केला

या बाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी दि 27 जुलै रोजी सकाळी सहा वाजता भोकर तालुक्यात त्यांचे श्रद्धास्थान गुरु असलेल्या भुरुभुशी येथे जाऊन महंताचे दर्शन घेतले व नंतर आष्टी येथे त्यांचे वडील माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांच्या समाधीचे व आईचे दर्शन घेऊन हदगांव येथे आल्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथील युवासेना तालुका संघटक संतोष पुलेवार यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण व महादेवाच्या जलाभिषेक कार्यक्रमाचा आढावा घेत उपस्थीत सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त केले त्यानंतर हदगाव येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करून उपस्थित शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हदगाव येथील संपर्क कार्यालयामध्ये किनवट, हिमायतनगर, हिंगोली, वसमत, उमरखेड, महागांव, माहूर, कळमनुरी, बाळापुर सह इत्यादी भागातून शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी युवासेना तालुका समन्वयक. संतोष पुलेवार पोटेकर, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठलदादा ठाकरे,उत्तमराव माने, गजानन पाटील सुर्यवंशी, युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील सोनारीकर, संदिपराव देशमुख, बंधु देशमुख, बाळु खडके, विशाल अललवाड, अजिक्य पिन्नलवार,गजानन वालेगावकर, प्रल्हाद सुर्यवंशी, सुर्यवंशी सर, धोडींबा घुमनर, माधव डोखळे, शामराव डोखळे, नागनाथ वच्छेवाड, युवराज देशमुख, हनुमंत देशमुख, नागोराव जळपते,आकाश ठाकरे, रोहित ठाकरे, पप्पू सोळंके, गगांधर माने,संतोष राठौड़, आर्जन राठोड,यांच्या सह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…