हदगाव (प्रतिनिधी) | तालुक्यातील हडसणी येथील गायरान जमिनीवर होत असलेल्या अवैध अतिक्रमणाचे प्रकरण आता तापू लागले आहे. या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी आणि अतिक्रमण रोखण्यासाठी संदेश पाटील हडसणीकर व परिवर्तन संघटनेच्या वतीने मा. तहसीलदार, हदगाव यांना अधिकृत अर्ज देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
गायरान जमीन सार्वजनिक मालमत्ता गायरान जमीन ही कोणत्याही व्यक्तीची खाजगी मालमत्ता नसून ती गावातील जनावरांच्या चराईसाठी आणि सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असलेली शासकीय मालमत्ता आहे. अशा जमिनीवर अतिक्रमण होणे हे कायदेशीर गुन्हा असून, यामुळे पर्यावरणाचे आणि गावाच्या सार्वजनिक हिताचे नुकसान होत आहे. संदेश पाटील हडसणीकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देत, ही जमीन वाचवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी भूमिका मांडली आहे.














