रस्त्यावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना करावी लागत आहे तारेवरची कसरत
तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी!

हदगाव तालुक्यातील निवघा बाजार जवळच असलेल्या महाताळा येथील नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या गावाजवळील लोकांना निवघा बाजार एक मोठी व्यापारपेट असल्यामुळे नागरिकांना रोज याच रस्त्याने येजा करावी लागते. दररोज जवळपास हजारो नागरिक याच रस्त्याने येजा करत असतात.
या मार्गावर २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असते. निवघा बाजारपेठेत जाण्यासाठी हाच एक रस्ता असल्यामुळे याच रस्त्याने नागरिक जात असतात. जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे नागरिक व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून निवघा ते महाताळा रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकाकडून होत आहे.

## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##
























