तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!




हदगाव तालुक्यातील मौजे उमरी खूर्द येथे वादळी वाऱ्यामुळे सोलार प्लेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी सौ. छाया मारुती वाठोरे गट क्रमांक २४९ यांच्या शेतातील सोलर प्लेट महावितरण/महाऊर्जा/मेधा शासनाच्या मुख्यमंत्री सोलार योजनेच्या असून 5 एचपी कृषी पंप बसवलेला असून 1/ 6/ 2026 रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सोलर प्लेट उडून गेले त्यामध्ये त्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यामध्ये पाच प्लेटा फुटले आहेत त्यामुळे त्याचा पंचनामा करून शासनाने शेतकऱ्याला मदत द्यावी अशी गावचे सरपंच वाय.एस .इंगळे व गावातील खंटीपाळ शामराव घोडके, रुपेश मारुती वाठोरे, विशाल घोडके, संतोष बाबाराव शिंदे, अर्जुन शेषराव इंगळे यांनी शासनाला विनंती केली आहे.
सत्यप्रभा न्यूज नांदेड
























