प्ररभणी दि. २४ मे : राज्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवू लागली असून शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठीही डिझेल मिळत नसल्याचे चित्र आज पुन्हा एकदा दिसून आले. मराठवाड्याचे हे चित्र प्रकर्षणाने पाहायला मिळाले.परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनांसह कॅन घेवून नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. मानवत तालुक्यातील रूढी पाटी शिवारातील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून रांगेत उभ्या असलेल्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.अक्षरशः एकमेकांना कॅन फेकून हे तरुण मारत असल्याचे दिसून आले आहे .हाणामारीच्या या घटनेमुळे या पेट्रोल पंप परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत संबंधितांना शांत केले.
या प्रकारामुळे काही काळ पेट्रोल पंपावरील वाहतूक आणि डिझेल वितरण विस्कळीत झाले होते.दरम्यान, जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे वाहनधारकांमध्ये अस्वस्थता वाढत असून अनेक ठिकाणी रांगा आणि गोंधळाचे प्रकार समोर येत आहेत. एकीकडे सर्वसामान्य शेतकरी रात्रभर डिझेलसाठी रात्र जागून काढतो, चार तास-पाच तास लाईनला लागल्यानंतर कुठे दोन हजार रुपयांचे डिझेल कॅन मध्ये मिळत आहे .
तर दुसरीकडे वाळूच्या गाड्यांना मुबलक प्रमाणात डिझेल मिळत असल्याचे दिसून येत आहे. या डिझेल टंचाईची झळ वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वर झालेली दिसत नाही. वाळू माफीयांना वाळूच्या गाड्यांसाठी हवं तेवढं डिझेल मिळतय. त्यावर आता पुरवठा विभाग कारवाई करणार का हा प्रश्न विचारला जातोय. या सरकारला शेतकरी जगवायचा आहे की वाळू माफिया हाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर काही जणांनी पेट्रोल पंपावर लाईन ला लागून कॅनमध्ये डिझेल घेऊन ते वाहनांना विकण्याचा धंदा सुरु केल्याचेही दिसून येत आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!






















