हिंगोली दि.२४ मे: मराठवाड्यातल्या बीडमध्ये सातत्याने अमानुष मारहाणीच्या घटना घडत असतात. स्व. संतोष देशमुखांच्या प्रकरणाने तर संपूर्ण राज्य हादरुन गेलं होतं. तशीच काहीशी घटना मराठवाड्यातल्याच हिंगोली जिल्ह्यामध्ये घडली आहे. दोघेजण मिळून एकाला काठीने अगदी गुरासारखं मारत आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.
हिंगोली जिल्ह्यातील विरेगाव परिसरातील ही घटना आहे. बनियवर असलेले दोघेजण काठीच्या सहाय्याने एकाला अमानुष मारत आहेत. मारहाण करणारे दोघेजण विरेगावमधील असल्याचे पुढे आले आहे. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणाने झाली हे स्पष्ट झालेलं नाही.
पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होतेय. ही मारहाण आर्थिक कारणावरून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.






















