नांदेड दि२५ मे.पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे, निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेचा ठसा उमटवणारे ‘आवाज महाराष्ट्राचा २४×७ न्यूज’चे मुख्य संपादक तथा ‘दैनिक जनसाहारा’चे लोहा प्रतिनिधी शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या सामाजिक कार्यकर्ता तथा मा.विनोद रोहिदास डाकोरे यांना सन २०२६ चा प्रतिष्ठित ‘युवा पत्रकार गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशामुळे लोहा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विनोद डाकोरे यांनी पत्रकारितेत पाऊल ठेवल्यापासून नेहमीच समाजहिताच्या बातम्यांना प्राधान्य दिले आहे. उपेक्षित, वंचित आणि सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करत त्यांनी प्रशासनाला अनेकदा लोकहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय, धाडसी आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थान भास्कर व्यायाम शाळा व क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय युवा पत्रकार गौरव पुरस्कार सोहळा या गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, हा पुरस्कार आजच्या नवयुवकासाठी आदर्श ठरणार आहे संस्था व क्रीडा मंडळ अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी या पुरस्काराचे दखल घेतली पुरस्काराचे मानकरी विनोद डाकोरे ला पुढील यशस्वी वाटचालीस अनेक मान्यवरांनी व हितचिंतकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!






















