• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, March 8, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

सहा जोडप्यांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकत्र नांदण्याचा घेतला निर्णय

10 December 2023
in नांदेड, महाराष्ट्र
image editor output image2073745703 1702215956069
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. 10 : महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार 9 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण 31 प्रकरणातील 6 जोडप्यांनी एकत्र नांदण्याचा निर्णय घेत आपआपसातील तडजोड व सामंजस्याचे महत्त्व अधोरेखीत केले. 6 व्यतिरिक्त अन्य प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. या जोडप्यांना आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी केले होते. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

•विविध प्रकरणांत 15 कोटी 6 लाख 38 हजार 336 रुपये रक्कमेबाबत तडजोड
•नांदेड जिल्ह्यात एकुण 5 हजार 704 प्रकरणे सामोपचाराने निकाली
•ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलची 868 प्रकरणे तडजोडीने निकाली

नांदेड जिल्ह्यात एकुण 5 हजार 704 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. यात 15 कोटी 6 लाख 38 हजार 336 रुपये एवढ्या रक्कमेची विविध प्रकरणात तडजोड झाली. यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.ॲक्ट, बॅक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी, पाणीपट्टीचे प्रकरणे व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय यांच्या प्रलंबित प्रकरणांचा व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बँकांचा, तसेच विद्युत प्रकरणे, दुरसंचार विभागाची टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा यात समावेश होता. याचबरोबर पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 999 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे.

या लोकअदालतीच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडिया नांदेड विभागीय अधिकारी श्री. कालिदास व श्री. जगताप यांनी त्यांच्या विभागातर्फे नांदेड जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी भव्य पेंडालची व्यवस्था केली. याचबरोबर लोकअदालतीसाठी जमलेल्या सर्व पक्षकारांसाठी खिचडी वाटपाची सेवा देऊन सहकार्य केले. या लोकअदालतीच्या निमित्ताने जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ आणि भूसंपादन अधिकारी, नांदेड मनपा आयुक्त, महसूल विभाग अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व प्रबंध जिल्हा न्यायालय नांदेड, सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे मोलोच सहकार्य लाभले.

image editor output image2101451333 1702215935447

या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर, नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज, नांदेड मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले.

सर्व पक्षकार, सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी मानले व यापुढेही अशाच सहकार्याची आपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलची 868 प्रकरणे तडजोडीने निकाली

जिल्ह्यातील एकूण 1 हजार 310 ग्रामपंचायत मार्फत मालमत्ता करवसुली बाबत प्रलंबित असलेली 6 हजार 801 प्रकरणे लोकन्यायालयात दाखल करण्यात आली होती. यात तडजोडअंती 38 लाख 88 हजार 886 एवढी रक्कम वसूल करण्यात आली. याचबरोबर केंद्र व राज्यामार्फत घरकुलाचा पहिला हप्ता मिळून घरकुल बांधकाम सुरू न केलेली 9 हजार 975 प्रकरणे ग्रामपचायतीतर्फे या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी तडजोडीअंती 868 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पुढाकार घेऊन सर्व ग्रामपंचायतीची प्रकरणे तडजोडीने निकाली निघण्यासाठी लोकन्यायालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीमती मंजुषा कापसे यांनी समन्वय साधून ग्रामपंचायतींची जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयापुढे ठेवली. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी याचे काटेकोर नियोजन केले. नांदेड पंचायत समिती मार्फत एकूण 12 लाख 10 हजार 901 रुपयाची एवढी करवसुली यातून केली.

ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज संस्था आसुन तिचा रोजचा व्यवहार चालवण्याकरिता ती संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावयास हवी त्यावर मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीसाठी ग्रामपंचायतींना राष्ट्रीय लोकअदालतीचे मोलाचे सहकार्य होत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीमती मंजुषा जाधव (कापसे) यांनी दिली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

उद्वव ठाकरे गटाने केली शिंदेंच्या २३ आमदारांची कोंडी!

Next Post

पनवेल महानगरपालिका पदाच्या विविध पदासाठी परीक्षा संपन्न – परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार नाही

Next Post
image editor output image 568195462 1702216391065

पनवेल महानगरपालिका पदाच्या विविध पदासाठी परीक्षा संपन्न - परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10298
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7858
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6405
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

292
image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
image editor output image1307372921 1772720967885

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
image editor output image1286131938 1772720828181

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

5 March 2026

Recent News

image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
image editor output image1307372921 1772720967885

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
image editor output image1286131938 1772720828181

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

5 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज