नांदेड दि.१२: भारतीय जनता पार्टीच्या नांदेड महानगर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात झाला असून नांदेड महानगर उपाध्यक्ष पदी भाजपा मध्ये मागील अनेक वर्षांपासून सक्रीय असलेले ,सराफा मार्केट येथील अमोल कुलथीया यांची नियुक्ती करण्यात आली.
भाजपाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी नुकतेच परिपत्रक जाहीर करून महानगर कार्यकारिणीची विस्तार केला आहे.
भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपा द्वारे गोरगरिबांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ गोरगरिबा पर्यंत पोहोचवण्याचं कार्य प्रामाणिकपणे ते करत आले आहेत त्यांच्या या कार्यास पाहून आज त्यांना भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे
त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













