अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. जो बायडन यांच्या ताफ्याला एक भरधाव कार धडकल्याची घटना घडली आहे. या जो बायडन आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना कारने त्यांच्या ताफ्याला धडक दिली. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.
एका चौकातून पुढे जात असताना एका फोर्ड कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार थेट बायडन यांच्या ताफ्यातील वाहनाला धडकली. त्यानंतर जो बायडन यांच्या सुरक्षारक्षकांनी कारला घेरलं आणि चालकाला ताब्यात घेतलं.
#WATCH | US President Joe Biden rushed into his vehicle as a car crashed into a vehicle attached to his motorcade.
(Source: Reuters) pic.twitter.com/2ooVcY0BQo
— ANI (@ANI) December 18, 2023













