
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : ०८/०१/२०२४
प्रोझोन मॉलसह शहरातील सर्व दुकाने व प्रतिष्ठान यांनी दुकानाचे नावफलक किंवा साइनबोर्ड मराठी भाषेतपण लावावे, असे आदेश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले.
मनपा प्रशासकांनी प्रोझोन मॉलला भेट दिली आणि मॉलमधील सर्व शोरूम मालकांना त्यांच्या दुकानाचे, प्रतिष्ठानचे नाव राज्य शासनाचा आदेशानुसार मराठी भाषेत लिहण्याचे निर्देश दिले. याशिवाय ज्या शोरूम्सचे नाव मराठी भाषेत बारीक अक्षरात लिहले आहे त्यांनी मोठ्या अक्षरात नावे लिहावे, असे निर्देशही यावेळी प्रशासकांनी दिले. मराठी भाषेत साइनबोर्ड लावण्यासाठी त्यांनी 15 दिवसाची मुदत दिली.
ही मुदत संपल्यावर पण प्रोझोन मॉल आणि शहरातील इतर सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानांचे साइनबोर्ड मराठी भाषेत नाही लावले तर अशी दुकाने आणि प्रतिष्ठानांना सील करण्यात येईल असा इशाराही प्रशासकांनी यावेळी दिला. Being human, Mufti, Jack&jones, ABS fitness यांनी मराठी भाषेत नावफलक लावले नाहीत. त्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत.
सत्यप्रभा न्यूज